घर देश-विदेश शी जिनपिंग यांची जी-२० शिखर परिषदेला बगल

शी जिनपिंग यांची जी-२० शिखर परिषदेला बगल

Subscribe

चीनकडून स्पष्टीकरण, भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

भारताची राजधानी दिल्लीत येत्या शनिवार-रविवारी (९-१० सप्टेंबर) जी-२० शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला जगभरातील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनही उपस्थित राहणार आहेत, मात्र भारत-चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

जिनपिंग यांच्या ऐवजी चीनचे प्रिमियर ली क्वांग हे या परिषदेला हजेरी लावतील, असे स्पष्टीकरण चीनकडून देण्यात आले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनीदेखील यापूर्वीच आपण भारतातील जी-२० परिषदेला हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे रशियाकडून त्यांचे परराष्ट्र मंत्री सर्गे रावरोव हे जी-२० परिषदेला हजेरी लावणार आहेत.

- Advertisement -

दिल्लीतील जी-२० शिखर परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला-द-सिल्वा आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

जो बायडेन निराश
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग जी-२० परिषदेला उपस्थित राहणार नसल्याच्या वृत्तावर भाष्य करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, मी निराश झालो आहे, पण मी त्यांना लवकरच भेटणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -