Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पीपीई कीट घालून कोटाच्या न्यू...

Live Update: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पीपीई कीट घालून कोटाच्या न्यू मेडिकल कॉलेजची केली पाहणी

Related Story

- Advertisement -

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पीपीई किटमध्ये कोटाच्या न्यू मेडिकल कॉलेजची पाहणी केली.


- Advertisement -

राज्यातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेले सुबोध जयस्वाल नवे सीबीआय प्रमुख


देशातील कोरोना दुसऱ्या लाटेत ५१३ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे.

- Advertisement -


राज्यात गेल्या २४ तासांत २४ हजार १३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६०१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५२ लाख १८ हजार ७६८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९० हजार ३४९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यूदर १.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. सविस्तर वाचा


देशात आतापर्यंत २० कोटींहून अधिक लसीकरण पार पडले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली आहे.


गोव्यात २४ तासांत १ हजार ५४९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ हजार ८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या गोव्यात १५ हजार ७०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी केली नुकसान भरपाईची घोषणा


सातारा जिल्ह्यात 1 जूनपर्यत कडक लॉकडाऊन


रत्नागिरीत उदय सामंतांची देवेंद्र फडणवीसांशी गुप्त भेट

शिवसेना नेते, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतली. ही गुप्त भेट झाली असल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ व्यक्त होत आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत १ लाख ९६ हजारांहून अधिक नवे कोरोना रूग्ण आढळले असून एका दिवसात ३ हजार ५११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ लाख २६ हजार ८५० जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘यास’ चक्रीवादळ निर्माण झाले असून त्याची तीव्रता आता वाढली आहे. येत्या २४ तासात यास हे ओडिशा-बंगालच्या किनारी धडकणार असून त्यामुळे या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मुंबईत पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर

मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठयावर पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोल आज २२ पैशांनी वाढले, तर डिझेलच्या दरात २७ पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल ९९.७५ रुपये आहे तर डिझेल ९९.६१ रुपये आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ९३.४४ रुपये आणि डिझेलची किंमत ८४,३२ रुपये प्रति लीटर झाली आहे.


नवी मुंबई मनपा क्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, एरोली या विभागात आज म्हणजे २५ मे रोजी पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे या क्षेत्रातही पाणीपुरवठा होणार नाही. आज संध्याकाळपासून पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात येणार असून, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागांत आज संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.


पुणे जिल्ह्यात साधारण २५ लाख २५ हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. यामध्ये पुणे शहरात सुमारे साडेनऊ लाख, पिंपरी चिंचवड पावणेपाच लाख आणि ग्रामीण भागातील अकरा लाख नागरिकांचा समावेश असणार आहे. पुणे जिल्ह्यातील ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांचे ८० टक्के लसीकरण झाले आहे तर ३८ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर, ११ टक्के नागरिकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.


गेल्या काही दिवसांपासून टूलकिटचा वाद हा चर्चेत होता आणि तो सध्या वाढतांना दिसतोय. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्या ट्वीटला मॅन्युपुलेटेड मीडिया सांगणाऱ्या ट्विटर इंडियाच्या ऑफिसवर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सोमवारी धाड टाकली आहे.

- Advertisement -