घरताज्या घडामोडीLive Update: पुण्यात २४ तासांत २,९९९ नव्या रुग्णांची नोंद, ७४ जणांचा मृत्यू

Live Update: पुण्यात २४ तासांत २,९९९ नव्या रुग्णांची नोंद, ७४ जणांचा मृत्यू

Subscribe

पुण्यात २४ तासांत २ हजार ९९९ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ७४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ५ हजार ७४४ जण कोरोनामुक्त झाले आहे.

- Advertisement -

मुंबईत आज १ हजार ३६२ बाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या २४ तासात आज १ हजार ३६२ बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मुंबईत आज १ हजार २१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

- Advertisement -


गोव्यात १ हजार ४८७ नव्या रुग्णांची नोंद

गोव्यात गेल्या २४ तासात १ हजार ४८७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १ हजार ३६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गोव्यात सध्या १५ हजार ९७१ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


भाजपच्या मराठा नेत्यांचा उद्यापासून महाराष्ट्र दौरा

भाजपचे उद्यापासून ९ मराठा नेते महाराष्ट्र दौरा करणार आहेत. प्रविण दरेकर, नारायण राणे, आशिष शेलार, हर्षवर्धन पाटील, नरेंद्र पाटील यांचे दौरे उद्यापासून राज्यभरात सुरू होत आहेत. मराठा नेता आणि कार्यकर्त्यांशी भाजपचे मराठा नेते संवाद साधणार आहेत.


जळगावातील मुक्ताईनगरमध्ये भाजपला धक्का बसला आहे. मुक्ताईनगरमधील १० भाजप नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी प्रवेश होणार आहे. गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवक प्रवेश करणार आहेत.


राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १७,८३१ ऑक्सिजने कंस्ट्रेटर्स, १८,१११ ऑक्सिजन सिलेंडर आणि १९ ऑक्सिजन प्लांड करून दिले आहेत. तर १३,४८९ व्हेंटिलेटर, ६.९ लाख रेमडेसिवीर आणि १२ लाख फॅविपीरावीराच्या गोळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.


झारखंडमध्ये यास चक्रीवादळ उद्या धडकणार

यास चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमधील विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. ठिकठिकाणी वाऱ्याच्या वेगानं पडझड झालेली आहे. झारखडंमध्ये आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.


‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते भूवनेश्वर, मुंबई-कोलकाता विमान वाहतूक पुढील ६ तासांसाठी बंद, सर्व फ्लाईट रद्द


कोरोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्येही महाविकास आघाडी सरकारनं भ्रष्टाचार केला आहे. भाजप नेते नारायण राणेंनी असा आरोप करत थेट संजय राऊतांना आवाहन


लसीसाठी मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या निविदांना ८ पुरवठादारांचा प्रतिसाद


कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. कोरोना संकटात सकारात्मक राहण्यासाठी गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणीचा आधार घ्या. – पंतप्रधान मोदी


निसर्गाचा आदर करणं ही बुद्ध यांनी दिलेली शिकवण अतिशय महत्त्वाची आहे. कोरोना संकटात सगळ्यांनीच बुध्दांची शिकवण आचरणात आणली पाहिजे – पंतप्रधान मोदी


जगभरात कोरोनाने हाहाकार मांडला आहे. लस हेच कोरोना लढाईतील महत्त्वाचं शस्त्र आहे. भारतातील कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही – पंतप्रधान मोदी


बौद्ध पौर्णिमेआंतरराष्ट्रीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संबोधन सुरू


कोरोनामुळे संपूर्ण देश संकटात आहे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सर्वच सामोर जात आहेत. वर्षभरात कोरोनावर लस शोधणाऱ्या वैज्ञानिकांचा सार्थ अभिमान आहे – पंतप्रधान मोदी


देशात २ लाख ८ हजार ९२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, ४ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू


बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात आज सकाळी पावणे दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाकडून हा कार्यक्रम आयोजित करणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मोदी असणार आहेत. काहीच वेळात हा कार्यक्रम सुरू होणार असून या कार्यक्रमात जगभरातील प्रमुख कार्यकर्ते सहभागी असणार आहे.


पुणे एक्स्प्रेस मार्गावर खाजगी बसचा अपघात, ४ जण जखमी

मुंबई – पुणे एक्स्प्रेस मार्गावर खाजगी बसचा अपघात झाला असून या अपघातात ४ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहिती नुसार, माडपनजीक सिमेंट ट्रक आणि खाजगी बसचा अपघात झाला. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर माडपनजीक अपघात झाला असून ४ जखमी प्रवाशांना नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


पुण्यात कोरोनाचा संसर्ग कायम असून येत्या १ जुनपासून पुण्यात संपूर्ण अनलॉक करु नका, अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव असला तरी संपूर्ण अनलॉक करणं योग्य ठरणार नाही. यासह सर्व दुकाने एकाचवेळी उघडण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असेही ते म्हणाले.


चक्रीवादळ किनारपट्टी भागात पोहोचण्यापूर्वीच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागामध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली. चक्रीवादळ धडकण्यापूर्वीच ओडिशातील लोकांचे सुखरूप जागी स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे. पश्चिम बंगाल मधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यामध्ये समुद्र उसळल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.


औरंगाबाद येथील कर्मवीर श्री शंकर सिंग नाईक हायस्कूलमधील कलाशिक्षक राजेश निंबेकर यांनी पिंपळाच्या पानावर रांगोळीच्या माध्यमातून गौतम बुद्धांची रांगोळी काढून आपल्या कलेच्या माध्यमातून अभिवादन केले आहे. संपूर्ण जगात पिंपळाच्या पानावर गौतम बुद्धांची रांगोळी रेखाटण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या उपक्रमाची नोंद घेतली गेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -