The Kashmir Files चित्रपट न पाहणाऱ्यांविरोधात २ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेचा कायदा करायला हवा, यशवंत सिन्हा यांचे वादग्रस्त ट्विट

एकीकडे चित्रपटातून काश्मिरी पंडितांचे सत्य जगासमोर मांडल्याने चित्रपटाचे कौतुक होतय तर दुसरीकडे चित्रपटावर सडकून टीका केली जातेय.

yashwant sinha tweet on the kashmir files movie

काश्मिरी पंडितांच्या प्रश्नांवर भाष्य करणारा द काश्मिर फाईल्स या चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. देशातील अनेक राज्यांनी चित्रपट टॅक्स फ्री म्हणून घोषित केला आहे. एकीकडे चित्रपटातून काश्मिरी पंडितांचे सत्य जगासमोर मांडल्याने चित्रपटाचे कौतुक होतय तर दुसरीकडे चित्रपटावर सडकून टीका केली जातेय. तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी यावेळी चित्रपटावरुन एक वादग्रस्त ट्विट करत सत्ताधारी भाजपला टोला लगावला आहे.

यशवंत सिन्हा यांनी ट्विट करत म्हटलेय, “द काश्मिर फाईल्स चित्रपट संपूर्ण भारतात टॅक्स फ्री करणे पुरेसे नाही. सर्व भारतीय लोकांना हा चित्रपट पाहणे सक्तीचे व्हावे यासाठी संसदेने एक कायदा करावा. तसेच जो चित्रपट पाहणार नाही त्याला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा केली पाहिजे. त्याचप्रमाणे जे चित्रपटावर टीका करतील त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा करायला हवी”, असे उपरोधिक ट्विट करत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

आता OTT प्लॅटफॉर्मवर झळकणार ‘The Kashmir Files’

द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. अनेक भाजपशासित प्रदेशांमध्ये चित्रपट पाहण्याचे आवाहन केले जात आहे. गोवा, मध्य प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. तर अनेक राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांना चित्रपट पाहण्यासाठी अर्ध्या दिवसाची सुट्टी देखील दिली जात आहे.

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाईल्स’मधून जगासमोर येणार काश्मिरी पंडितांचा संघर्ष

चित्रपट रिलीज झाल्यापासूनच काँग्रेसकडून सातत्याने टीका टिप्पणी सुरू आहे. चित्रपट रिलीज झाल्याच्याच दिवशी काँग्रेसकडून ट्विटच्या माध्यमातून काश्मिरी पंडितांच्या इतिहासाविषयी काही दावे आणि खुलासे करण्यात आले होते. रिलीजच्या १ आठवड्यानंतरही चित्रपटावर होणारी टीका सुरूच आहे.

पंतप्रधान मोदींनाही भावला ‘The Kashmir Files’ सिनेमा


हेही वाचा – The Kashmir Files : गोव्यासह ‘या’ राज्यांमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री

हेही वाचा – The Kashmir Files वरून काँग्रेसने ट्विट करत BJPवर साधला निशाणा