घरदेश-विदेशफुटीरतावादी नेता यासिन मलिकला अटक

फुटीरतावादी नेता यासिन मलिकला अटक

Subscribe

जम्मू काश्मीरच्या लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक याला अटक करण्यात आली आहे. काल उशीरा रात्री मलिकला अटक करण्यात आली आहे. 

जम्मू काश्मीर, पुलवामा मध्ये झालेल्या भ्याड दहशदवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० हून अधिक जवान हे शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारत सरकार वेगवेगळ्या भूमिका घेताना दिसते. त्यामध्ये आता भारत सरकारने जम्मू-कश्मीरमधार फुटीरतावादी नेत्यांवर चाप लावण्याची मोठी भूमिका हाती घेतली आहे. या फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा आणि थेट कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. जम्मू काश्मीरच्या लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक याला अटक करण्यात आली आहे. काल उशीरा रात्री मलिकला अटक करण्यात आली आहे. अनुच्छेद ३५ अंतर्गत यासिनला अटक करण्यात आली आहे. मलिकला माईसुमा परिसरात असलेल्या घरातून अटक करण्यात आली. अटक करून त्याला कोथिबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

बंदूका उचलणाऱ्यांना क्षमा नाही 

काश्मीरमधील फुटीरतावादी नेते अनेकदा पाकिस्तानशी संपर्कात असल्याचे दिसून आले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर आता या नेत्यांबद्दल भारताने कठोर पाऊले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वी सराकरने यांची सुरक्षा काढून घेतली. यानंतर आता सरकारने अशा नेत्यांना अटक करण्याची भूमिका घेतली आहे. काश्मीरी नागरिकांनी भारताचे समर्थन करावे असे आवाहन भारतीय लष्कराच्या वतीने केले होते. काश्मीरी तरुणांनी बंदूका बाळगल्यास त्यांना क्षमा केली जाणार नसल्याचे लष्कराने सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -