यासीन मलिकला यामुळे तिहार तुरुंगात ठेवण्यात आले एकांतवासात

Yasin Malik has been kept in solitary confinement in Tihar Jail
यासीम मलिकला यामुळे तिहार तुरुंगात ठेवण्यात आले एकांतवासात

काश्मिरचा फुटीरतावादी नेता यासीन मलिक (Yasin Malik) याला दिल्ली विशेष एनआयए न्यायालयाने (NIA Court) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यानंतर तो आता जगापासून वेगळा झाला आहे. त्याला आता आयुष्यभर तिहार तुरुंगात (Tihar Jail) एकांतवासात राहणार आहे. गेल्या सुनावणीदरम्यान, मलिक यांनी आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचा बचाव करण्याची इच्छा न्यायालयाकडे व्यक्त केली नव्हती. त्याने स्वतः गुन्ह्याची कबुली दिल्याने तो शिक्षेला उच्च न्यायालयांमध्ये आव्हानही देऊ शकत नाही.

मलिकला ठेवले कैद्यांपासून ही आलिप्त –

मलिक (Yasin Malik) केवळ बाहेरच्या जगापासून अलिप्तच नाही, तर त्याला सुमारे १३ हजार कैद्यांपासून दूर कारागृहात (Tihar Jail) एकटे ठेवले आहे. याबाबत माहिती महासंचालक संदीप गोयल यांनी दील आहे. यावेळी तो आधीच तुरुंग क्रमांक 7 मध्ये आहे आणि सध्या तेथेच राहील. तो त्याच्या कोठडीत एकटाच असतो, असे ते म्हणाले.

यामुळे चर्चेत आहे बँरेक क्रमांक 7 –

तुरुंगातील (Tihar Jail) बॅरेक क्रमांक-7 नेहमीच चर्चेत असते. या बॅरेक क्रमांक-7 मध्ये माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, माजी केंद्रीय मंत्री ए.के. राजा, सहारा प्रमुख सुब्रत रॉय, ख्रिश्चन मिशेल यांच्यासह अनेकांना ठेवण्यात आले होते. 12 ऑक्टोबर रोजी तिहार तुरुंगातील 32 अधिकारी युनिटेकच्या माजी प्रवर्तकांशी संगनमत करताना सापडले होते. चंद्रा बंधू अजय चंद्रा आणि संजय चंद्रा तुरुंगातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने तिहार तुरुंगातून व्यवसाय करत होते, असा आरोप त्यांच्यावर आहे. वरील सर्व 32 तुरुंग अधिकारी तिहारच्या तुरुंग (Tihar Jail) बॅरेक क्रमांक 7वर तैनात होते.

मलिकला तुरुंगात देण्यात आले नाही कोणतेही काम –

न्यायालयाने बुधवारी दोषी मलिक (Yasin Malik) याला दोन खटल्यांमध्ये जन्मठेपेची आणि अन्य प्रकरणांमध्ये स्वतंत्रपणे शिक्षा सुनावली आहे. सश्रम कारावास म्हणजे कारागृहातील व्यवस्थेनुसार गुन्ह्याच्या स्वरूपामुळे त्याला दिलेल्या शिक्षेची अडचण वाढेल अशा प्रकारे गुन्हेगाराला झालेला कारावास होय. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतरही मलिकला तुरुंगात कोणतेही काम दिले जाणार नाही. वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षेच्या कारणामुळे त्याला काम दिले जाणार नाही. काम देण्याबाबत कारागृहाच्या नियमांनुसार निर्णय घेतण्यात येतो असे त्यांनी सांगितले.