Year Ending 2021 : इंटरनेटवर वर्षभरात ‘या’ व्हिडिओंचा बोलबाला ; पाहा 2021 मधील सर्वाधिक Viral Video

Year Ending 2021: 'videos dominate the internet throughout the year; Watch the most viral video of 2021
Year Ending 2021 : इंटरनेटवर वर्षभरात 'या' व्हिडिओंचा बोलबाला ; पाहा 2021 मधील सर्वाधिक Viral Video

२०२० प्रमाणे २०२१ हे वर्षसुद्धा कोरोनाच्या सावटाखालीच गेले ज्यामुळे जगभरातील सर्वच मंडळी हैराण झाली. कोरोनामुळे संपूर्ण जग लॉकडाऊनमुळे घरातच बसून होते.त्यामुळे या दिवसात इंटरनेटचा वापर खूप जास्त प्रमाणात करण्यात आला. कारण घरात बसून, घरातील प्रत्येक सदस्यासाठी विरंगुळ्याचे साधन हे इंटरनेटच होते. इंटरनेटमुळे काही सकारात्मक गोष्टी घडतात तर काही नकारात्मक गोष्टी घडलेल्या तुम्ही पाहत असता.मात्र या कोरोनाच्या काळात नैराश्यातून बाहेर काढण्याचे,चेहऱ्यावर स्मित हास्य उमटवण्याचे काम या सोशलमिडियाने केले आहे. या कोरोना काळात कोणत्या व्हिडिओ जास्त वायरल झाल्या ते पाहा.

 पावरी हो रही है …

यावर्षी पाकिस्तानी तरुणी दाननीर मुबीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये मुबीन तिच्या कारकडे बोट दाखवत म्हणतो की, ही आमची कार आहे, हे आम्ही आहोत आणि आमची पार्टी होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड झाला होता. या व्हिडिओवर अनेक मीम्स आणि जोक्स वायरल झाले. इंस्टाग्रामवरही लोकांनी रील्स बनवले आहेत.

कोविड पीडित महिलेचा ‘लव्ह यू जिंदगी’ व्हिडिओ वायरल

डॉक्टर मोनिका लांगेह यांनी त्यांच्या आपल्या ३० वर्षीय रुग्णांचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्या ‘डियर जिंदगी’ या चित्रपटातील ‘लव्ह यू जिंदगी’ हे गाणे ऐकत आहे. मात्र, त्या मुलीची प्रकृती चिंताजनक झाल्याने काही दिवसांनी मुलीचा मृत्यू झाला.

 

बचपन का प्यार 

 

View this post on Instagram

 

A post shared by vishnu_singh91 (@only_mod031zzz)

छत्तीसगडमधील सहदेव दिल्डो या लहान मुलाचा ‘बचपन का प्यार’ व्हिडिओ या वर्षी चर्चेत होता. या व्हिडिओने सहदेवचे आयुष्यच बदलून टाकले. गायक बादशाहने सहदेवला गाण्याची संधी दिली.

डॉ. के.के. अग्रवाल यांच्या पत्नीने त्यांना फोनवर फटकारले

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. केके अग्रवाल लाइव्ह सत्रादरम्यान पत्नीशी बोलत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता.

श्वेता तुझा माइक चालू आहे.

या वर्षी श्वेता नावाची मुलगी सोशल मीडियावर खूप ट्रेंडमध्ये होती. वास्तविक, मुलगी ऑनलाइन क्लास झूम कॉलमध्ये मायक्रोफोन म्यूट करायला विसरली होती. वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुलीने एका मुलाची काही खाजगी माहिती शेअर केली आहे. तिच्या काही मैत्रिणी तिला माईक चालू असल्याचं सांगतात पण ती ऐकत नाही.

पीपीई कीटमधील डॉक्टरचा डान्स

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये उमेद वाढवण्यासाठी गुजरातच्या वडोदरामधील डॉक्टरांनी पीपीई कीट घालून डान्स केला होता. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस आला होता.

स्त्री म्हणते औषधापेक्षा दारु बरी

 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एप्रिल २०२१ मध्ये एका आठवड्याच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर दारूच्या दुकानांवर गर्दी झाली होती. दारू खरेदीसाठी रांगेत उभ्या असलेल्यांमध्ये एका वृद्ध महिलेचाही समावेश होता. ज्याने लॉकडाऊन दरम्यान दारूची दुकाने उघडी ठेवण्याचे सरकारला आवाहन केले. या महिलेने सांगितले की,औषधापेक्षा दारु बरी आहे.

झूम कॉलवर पत्नीने केले कीस


हे ही वाचा – Mhada recruitment 2021 : पुढच्या परीक्षेची जबाबदारी म्हाडा घेणार – जितेंद्र आव्हाड