घरताज्या घडामोडीInternet Blackout: ड्रोन हल्ल्यानंतर येमेनमध्ये इंटरनेट सेवा ठप्प

Internet Blackout: ड्रोन हल्ल्यानंतर येमेनमध्ये इंटरनेट सेवा ठप्प

Subscribe

सॅन डिएगो स्थित 'सेंटर फॉर अप्लाइड इंटरनेट डेटा अॅनालिसिस'ने जवळपास संपूर्ण येमेनमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिट खंडित झाल्याचे सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी येमेनच्या हुथी बंडखोरांनी संयुक्त अरब अमिरातवर मोठा ड्रोन हल्ला करण्यात आला होता. या ड्रोन हल्ल्यानंतर संपूर्ण येमेनमध्ये इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती AFPने दिली आहे.

नेटब्लॉक्स या संस्थेने सांगितले की, ‘इंटरनेटची समस्या स्थानिक पातळीवर रात्री एक वाजण्याच्या सुमार सुरू झाली होती. ज्यानंतर देशातील इंटरनेट पुरवणाऱ्या सरकारी ‘टेलीयमन’च्या सेवेवर परिणाम झाला. टेलियमन आता हुथी बंडखोरांच्या नियंत्रणाखाली आहे, ज्यांनी २०१४मध्ये येमेनची राजधानी सना ताब्यात घेतली होती.’ तसेच नेटब्लॉक्सने पुढे सांगितले की, ‘दूरसंचार भवनावरील हवाई हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील इंटरनेट कनेक्टिव्हिट ठप्प झाल्याची माहिती दिली आहे.’

- Advertisement -

सॅन डिएगो स्थित ‘सेंटर फॉर अप्लाइड इंटरनेट डेटा अॅनालिसिस’ने जवळपास संपूर्ण येमेनमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिट खंडित झाल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

हुथी बंडखोरांनी आधी मुसाफा भागातील तीन ऑईल टँकरमध्ये स्फोट घडवून आणला, यानंतर अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग लावली. ड्रोनच्या मदतीने हा हल्ला घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. ही घटना १७ जानेवारीला सकाळीच्या सुमारास घडली होती. येमेनच्या हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. अबूधाबी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले होते. यामध्ये दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश होता. संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारी डब्ल्यूएएम वृत्तसंस्थेने सांगितले होते की, ‘प्राथमिक तपासणीत असे दिसून आले की, लहान उडणाऱ्या वस्तू अर्थात ड्रोनच्या मदतीने हा हल्ला घडवून आणला आहे. अबुधाबीच्या दोन्ही भागात हे ड्रोन पडले आणि त्यामुळे स्फोट झाले होते.’


हेही वाचा – अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन हल्लात दोन भारतीयांचा मृत्यू; ‘या’ संघटनेने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -