घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटVideo- कोरोनाचा रूग्ण बरा झाल्यावर हॉस्पिटलचा स्टाफ करतो डान्स, व्हीडिओ व्हायरल!

Video- कोरोनाचा रूग्ण बरा झाल्यावर हॉस्पिटलचा स्टाफ करतो डान्स, व्हीडिओ व्हायरल!

Subscribe

लॉस एन्जलिसमधील रोनाल्ड रेगन हॉस्पिटलमधील हा व्हीडिओ आहे. या हॉस्पिटलमध्ये आयसीयू मधील कर्मचारी या व्हीडिओत डान्स करताना दिसत आहे.

सध्या जगभरात सगळेच कोरोनापासून सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोना पेश्नंटचे व्हीडिओ, फोटो, सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मृतांची आकडेवारी, कोरोना पेश्नंटची संख्या वाढत आहे. त्यामुळे जवळजवळ जग दुखा:त आहे. पण नुकताच लॉस एन्जलिसच्या एका हॉस्पिटलमधला व्हायरला झालेला हा व्हीडिओ तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद आणेल. हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओ सगळ्यांच्या पसंतीसही उतरत आहे.

लॉस एन्जलिसमधील रोनाल्ड रेगन हॉस्पिटलमधील हा व्हीडिओ आहे. या हॉस्पिटलमध्ये आयसीयू मधील कर्मचारी या व्हीडिओत डान्स करताना दिसत आहे. या हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्ण बरा झाल्यावर व्हेंटिलेटर काढल्यावर सगळे हॉस्पिटलचे कर्मचारी डान्स करत आनंद साजरा करतात.

- Advertisement -

डॉ. निदा कादीर यांनी हा डान्सचा व्हीडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे. आणि लिहिले आहे की, कोरोना रूग्ण आता बरा झाला आहे. तो बरा झाल्याच्या आनंदात माझे आयसीयू मध्ये काम करणारे कर्मचारी डान्स करत आनंद साजरा करत आहेत.

- Advertisement -

त्याचबरोबर डॉ. निदा यांच्या सहकार्याने हा फोटो शेअर करत लिहीले आहे की, आज दोन कोरोनाचे रूग्ण बरे झाले आहेत. आमचा हा छोटा विजय आम्ही साजरा करत आहोत. आज आम्ही स्वत:च्या आनंदासाठी काही क्षण डान्स केला.

या व्हीडीओला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत आठ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हीडिओ बघितला आहे. या व्हीडिओला मोठय् प्रमाणावर सकारात्मक प्रतिक्रीया मिळाल्या आहेत. सगळ्यांनी डॉक्टरचे आभार मानले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -