Yezdi new model 2022 : येझदीचे तब्बल 26 वर्षानंतर भारतात पुनरागमन ; 3 बाईक्स केल्या लाँच

झदीच्या या नव्या बाईक्स क्लासिक लेजेड्सच्या डीलरशीप नेटवर्कवर उपलब्ध असणार आहेत. यापूर्वी JAWA बाईक्सचीही विक्री करण्यात येणार आहे. बाईक्सप्रेमींना आता फक्त 5 हजार रुपये भरुन बाईक बुक करण्याची संधी देण्यात आली आहे.

Yezdi new model 2022: Yezdi returns to India after 26 years; Launch of 3 bikes
Yezdi new model 2022 : येझदीचे तब्बल 26 वर्षानंतर भारतात पुनरागमन ; 3 बाईक्स केल्या लॉंच

येझदीने तब्बल 26 वर्षानंतर भारतीय बाजारपेठेत पुनरागमन केले आहे. येझदीने भारतात येझदी अँडव्हेंचर (Yezdi Adventure) ,येझदी स्क्रॅम्बलर  (Yezdi Scrambler) आणि येझदी रोडस्टर (Yezdi Roadster) या मोटारसायकल लॉंच केले आहेत. या तीनही मोटारसायकल बाईकर्सना आकर्षित करत आहेत. येझदीने आज 13 जानेवारी गुरुवारपासून तिन्ही मोटारसायकलसाठी बुकिंगला सुरुवात केली आहे.क्लासिक लीजेंड्स (classic Legends)ने अधिकृतपणे तीन मोटारसायकल लॉंच करुन भारतात पुन्हा एकदा येझदी ब्रँड आणला आहे. हे येझदीचे तीनही मॉडेल रॉयल इनफिल्ड, केटीएम आणि हॉंडा यांच्या बाईक्सना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. येझदीच्या या नव्या बाईक्स क्लासिक लेजेड्सच्या डीलरशीप नेटवर्कवर उपलब्ध असणार आहेत. यापूर्वी JAWA बाईक्सचीही विक्री करण्यात येणार आहे. बाईक्सप्रेमींना आता फक्त 5 हजार रुपये भरुन बाईक बुक करण्याची संधी देण्यात आली आहे.

काय आहे तीन बाईक्सची रेंज

  • येझदी अँडव्हेंचर – 2,09,900
  • येझदी स्क्रॅम्बलर – 2,04,900
  • येझदी रोडस्टर – 1,98,142

26 वर्षानंतर भारतात पुनरागमन 

भारतीय बाजारपेठेसाठी क्लासिक लीजेंड्सद्वारे आणलेला येझदी हा तिसरा ब्रँड आहे. Classic Legends ही महिंद्रा ग्रुपच्या मालकीची कंपनी आहे. यापूर्वी त्याने जावा (Jawa) आणि BSA मोटरसायकल (BSA Motorcycles) सारख्या ब्रँडचे रिव्हाईव्ह केले. या तीन मोटारसायकलींसह, येझदीने २६ वर्षांनंतर भारतीय बाजारपेठेत पुनरागमन केले आहे. 1961 मध्ये भारतात पहिल्यांदा लॉन्च झालेला हा ब्रँड रोडकिंग (Roadking), मोनार्क (Monarch) आणि डिलक्स (Delux) मॉडेल्ससह लोकप्रिय झाला. मात्र, दुचाकी उत्पादक कंपनीने 1996 मध्ये त्यांच्या बाइकचे उत्पादन बंद केले होते.


हेही वाचा – सुवर्णसंधी ! ‘Post Office’ च्या ‘या’ योजनेत फक्त 417 रुपयांत होऊ शकता करोडपती