घरताज्या घडामोडीYoga Day 2021:कोरोना काळात योग ठरला आशेचा किरण, योग दिनानिमित्त पंतप्रधानांचा देशवासियांशी...

Yoga Day 2021:कोरोना काळात योग ठरला आशेचा किरण, योग दिनानिमित्त पंतप्रधानांचा देशवासियांशी संवाद

Subscribe

'योगा फॉर वेलनेस' ही यंदाच्या योग दिनाची थीम

आज सातव्या आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त (7th internation Yoga Day) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi ) यांनी देशवासियांशी संवाद साधला. सातव्या योग दिनानिमित्त त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण जग आज कोरोना महामारीशी झुंज देत आहे. या काळात योग हा सर्वांसाठी आशेचा किरण बनला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे योग दिनानिमित्त कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही. मात्र योग दिनाचा उत्साह कायम आहे. ‘योगा फॉर वेलनेस’ ही यंदाच्या योग दिनाची थीम असल्याचे देखील पंतप्रधानांनी सांगितले. संपूर्ण जगाला योगाचे महत्त्व समजले आहे. कोरोना काळात योग करणे अधिक गरजेचे आहे. योगामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. प्राणायामामुळे श्वसनक्रिया बळकट होते. योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवा. घरी राहून योगा करा आणि निरोगी रहा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

कोरोना काळात योगामुळे आत्मबळ वाढले

संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले. या काळात अनेक देशांनी सामर्थ्य आणि मानसिक स्वास्थ गमावले होते. मात्र या काळात योगामुळे अनेकांना त्यांचे मानसिक स्वास्थ परत मिळवण्यासाठी, आपले आत्मबळ वाढवण्यासाठी योगाची खूप मदत झाली,असे पंतप्रधानांनी म्हटले. त्याचप्रमाणे भारतात चांगल्या आरोग्याचा विचार केला असता केवळ शारीरिक आरोग्य नाही तर योगा केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यही संतुलित राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे स्ट्रेस ते स्ट्रेंथ आणि निव्हेटिव्हिटी ते क्रिएटिव्ही पर्यतचा रस्ता योगामुळे साधता येतो,असे मोदींनी म्हटले.

- Advertisement -

जगाला मिळणार एम-योग अँपची शक्ती

योगाचे हे विज्ञान संपूर्ण जगाला उपलब्ध व्हावे ही भावना ठेवून संयुक्त राष्ट्रात भारताने आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव सादर केला होता. आज भारताने संयुक्त राष्ट्र, डब्ल्यूएचओ यांच्यासह या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलली आहेत. आता जगाला एम-योग अँपची शक्ती मिळणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून योग प्रोटोकॉलवर आधारित योग प्रशिक्षणाचे अनेक व्हिडिओ जगातील विविध भाषांमध्ये उपलब्ध होणार असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.


हेही वाचा – Corona Vaccination: गुडन्यूज! उद्यापासून देशभरात मोफत लसीकरण; CoWIN Appवर नोंदणी करणे बंधनकारक नाही

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -