‘कोणाचा बाप रामदेवला अटक करू शकत नाही’, बाबा रामदेव यांचे नवीन आव्हान

yoga guru baba ramdev first statement after comments on allopathy
'कोणाचा बाप रामदेवला अटक करू शकत नाही', बाबा रामदेव यांचे नवीन आव्हान

अॅलोपॅथी स्पुपिड सायन्स असल्याचे म्हणत कोरोनामुळे मृत्यू होण्यामागचे कारण अॅलोपॅथी असल्याचा दावा योग गुरू बाबा रामदेव यांनी काही दिवसांपूर्वी केला. तेव्हापासून बाबा रामदेव डॉक्टरांच्या निशाण्यावर आहे. काही जण या वक्तव्यामुळे कोरोना योद्धा डॉक्टरांचा अपमान झाल्याचे म्हणत आहे तर काही जण त्यांच्या अटकेची मागणी करत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) उत्तराखंड विभागाने बाबा रामदेव यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करत त्यांनी येत्या १५ दिवसांत माफी मागावी, अन्यथा १ हजार कोटींची भरपाई द्यावी अशी भूमिका घेतली आहे. यामुळे सध्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर बाबा रामदेव काय म्हणतात याकडे सगळ्याचे लक्ष्य लागले होते. पण याप्रकरणाबाबत आता बाबा रामदेव वाचा फोडली असून कोणाचा बाप देखील रामदेवला अटक करू शकत नाही असे नवीन आव्हान केले आहे.

अॅलोपॅथी संदर्भात वादग्रस्त विधान केल्यानंतर बुधवारी सोशल मीडियावर ‘अरेस्ट बाबा रामदेव’ असे ट्रेंड होत होते. ज्यानंतर बाबा रामदेव यांनी हे मोठे विधान केले आहे. यादरम्यान बाबा रामदेव यांनी आयएमएवर (IMA) टीका करत म्हणाले की, ‘त्यांचा बाप बाबा रामदेवला अटक करू शकत नाही. परंतु सध्या ते त्वरित स्वामी रामदेवला अटक करा असा आवाज करत आहेत. दरम्यान ते ट्रेंड चालवत राहतात. आता आपल्या लोकांना देखील ट्रेंड चालवण्याची प्रॅक्टिस झाली आहे.’ यावेळी रामदेव बाबा यांनी टाळ्या वाजवत आणि हसत म्हणाले की, ‘ट्रेंडमध्ये नेहमी टॉपवर असल्यामुळे तुम्हाला खूप शुभेच्छा.’


हेही वाचा –  बाबा रामदेव यांनी १५ दिवसांत माफी मागावी, नाहीतर १ हजार कोटींची भरपाई द्यावी – IMA