योगी सरकारच्या अर्थसंकल्पात युवकांच्या नोकरीबाबत मोठी घोषणा

प्रत्येक घरातील एका तरुणाला नोकरी देण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला असून, या टर्ममध्ये योगींनी आश्वासनांच्या पूर्ततेकडे वेगाने आगेकूच केल्याचे दिसून येत आहे.

uttar pradesh government Twitter accounts hacked after CM' yogi office twitter recover
योगी आदित्यनाथ सरकार 2.0 हॅकर्सच्या निशाण्यावर, CM कार्यालयानंतर आणखी २ सरकारी ट्विटर अकाउंट हॅक

प्रत्येक घरातील एका तरुणाला नोकरी देण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला असून, या टर्ममध्ये योगींनी आश्वासनांच्या पूर्ततेकडे वेगाने आगेकूच केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, योगी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या अर्थसंकल्पात निराधार महिला, वृद्ध, निवडक विद्यार्थी यांना पेन्शन- स्कॉलरशीप जाहीर केली आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघासह आपल्या मतदारसंघासाठीही मेट्रोची घोषणा केली आहे.

6 लाख 15 हजार 518 कोटींचा अर्थसंकल्प

युपीचे अर्थमंत्री विनोद खन्ना यांनी दोन दिवसांपूर्वी 6 लाख 15 हजार 518 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात वृद्धांना 1000 रुपये पेन्शन, शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 5 लाखांची नुकसान भरपाई, विधवा महिलांना 1 रुपये पेन्शन आदी घोषणा केल्या आहेत.

त्यानंतर विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी रोजगारासंदर्भात प्रश्न विचारला असता योगींनी ‘युवकांसाठी सरकार सज्ज आहे, त्यांच्या रोजगारासाठी सरकारने काही योजना तयार केल्या आहेत’, असे सांगितले. शिवाय, ‘सरकारकडून रोजगार कार्ड जारी करण्यात येणार आहे. त्यानुसार, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला रोजगार देण्यात येईल. आम्ही पोलीस खात्यात 5 लाख नोकऱ्या दिल्या. पण एकही प्रश्न विचारण्यात आला नाही. योग्येतनुसार उमेदवारांची तेथे निवड झाली आहे. राज्यात 1 कोटी 61 लाख युवकांना रोजगार देण्यात येणार असून 60 लाख स्वयंरोजगाराचीही योजना आहे’, असे योगींनी सांगितले.

अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा

  • अनाथ मुलांना 6 वी ते 12 वी पर्यंत मोफत शिक्षणासाठी 300 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
  • मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेसाठी 600 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
  • माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग धोरणांतर्गत पाच वर्षांत 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि चार लाख
  • लोकांना रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
  • बेरोजगारीचा दर जून 2016 मध्ये 18 टक्के होता, तो एप्रिल 2022 मध्ये तो 2.9 टक्क्यांवर आला आहे.
  • 4.22 लाख बेरोजगारांना नोकऱ्या देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्या मालकीचे नाहीत, संभाजीराजेंच्या प्रश्नावर राऊत संतापले