घरदेश-विदेशयोगी पुन्हा बरळले; मुस्लिम लीगमुळेच देशाचे विभाजन

योगी पुन्हा बरळले; मुस्लिम लीगमुळेच देशाचे विभाजन

Subscribe

मुस्लिम लीगचा मुद्दा उपस्थित करुन योगींनी काँग्रेसवर टीका केली आहे. मुस्लीम लीग व्हायरस असून त्यामुळे देशाचे विभाजन झाले.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ते चर्चत आले आहेत. मुस्लीम लीग व्हायरस आहे त्यामुळेच देशाची फाळणी झाली असल्याची टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. मुस्लिम लीगचा मुद्दा उपस्थित करुन योगींनी काँग्रेसवर टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी असे म्हटले आहे की, मुस्लिम लीग व्हायरस असून या व्हायरसमुळे काँग्रेस संक्रमित झाले आहे. योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या या वादग्रस्त ट्विटमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

- Advertisement -

मुस्लिम लीग एक व्हायरस

दरम्यान, काल काशीपूर येथे झालेल्या सभे दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. त्यांनी असे म्हटले होते की, केरळमध्ये देशाचं विभाजन करू पाहणाऱ्या मुस्लिम लीगबरोबर काँग्रेसचा गुप्त अजेंडा आहे. दरम्यान, आदित्यनाथ यांनी आज पुन्हा राहुल गांधींवर टीका केल्यामुळे ते वादात सापडले आहे. आदित्यनाथ यांनी मुस्लिम लीगवर टीका केली आहे. मुस्लिम लीग म्हणजे एक प्रकारचा व्हायरस आहे. जर अशी लोक जिंकली तर देशाचं काय होईल, हा व्हायरस पूर्ण देशात पसरेल, असे योगी आदित्यनाथ यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

- Advertisement -

मुस्लिम लीगने देशाचे विभाजन केले

उत्तराखंडच्या काशीपूर येथे भाजपच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, देशाला शेकडो वर्षानंतर १९४७ साली स्वतंत्र मिळाले. मात्र स्वतंत्रता दिवसाच्या पूर्वसंध्येला आपण देशाचे विभाजन झाल्याचे देखील पाहिले. मुस्लिम लीगनेच देशाचे विभाजन केले आहे. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी केरळमधून उमेदवारी अर्ज भरला. त्याठिकाणी त्यांचा मुस्लिम लीगसोबत एक सिक्रेट अजेंडा आहे. ही तिच संघटना आहे जी देशाच्या विभाजनाचे मूळ आहे, अशी टीका योगींनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -