घरताज्या घडामोडीVideo: योगिताच्या मृतदेहासोबत तिवारीला करायचं होतं ते कृत्य, पण

Video: योगिताच्या मृतदेहासोबत तिवारीला करायचं होतं ते कृत्य, पण

Subscribe

लग्नाला नकार दिल्यामुळे आगरा येथे माथेफिरू डॉक्टर विवेक तिवारीने त्याची मैत्रिण डॉ. योगिता गौतम हीचा निर्घृण खून केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणात आता नवीन खुलासे समोर येत आहेत. तिवारीला अटक केल्यानंतर चौकशीत त्याने आपला गुन्हा मान्य केला असून योगिताचे अपहरण आणि तिची हत्या कशी केली? याचा तपशीलच पोलिसांसमोर उघड केला. योगिताचे अपहरण केल्यानंतर त्याने तिला पुन्हा लग्नाची मागणी घातली. तिने नकार देताच गाडीतच गळा दाबून योगिताचा खून केला. मात्र ती मृत झाली की नाही? याचा पत्ता न लागल्यामुळे पुन्हा तिच्या डोक्यात गोळी घातली. गोळी घालून देखील त्याचे समाधान न झाल्याने तिवारीने योगिताच्या गळ्यावर देखील चाकूने वार केले.

योगिताचा खून केल्यानंतर तिवारीला तिचा मृतदेह जाळायचा होता. जेणेकरुन कुणालाही तिच्या मृत्यूचा थांगपत्ता लागू नये. त्यासाठी त्याने तिच्या मृतदेहावर लाकडे ठेवून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसामुळे लाकडे ओली झाल्यामुळे आग पकडली गेली नाही. त्याचवेळी तिथे काही लहान मुले आले. त्यांना पाहून तिवारी घाबरला आणि त्याने तिथून पळ काढला. डॉ. विवेक तिवारीने एक वर्षापूर्वीच योगिताला लग्नासाठी मागणी घातली होती. परंतु तिने नकार देऊन त्याचे फोनही घेणे बंद केले होते. तरिही तिवारी नंबर बदलून तिला पुन्हा कॉल करायचा. मात्र चार-चार तास तिचा फोन बिझी लागत असल्यामुळे तिचे इतर कुणाशी संबंध प्रस्थापित झाल्याचा संशय त्याला आला आणि त्यातूनच तिचा खून करण्याचा निश्चय तिवारीने केला.

- Advertisement -

 

हत्या प्रकरणाला जातीय किनार

डॉ. योगिता गौतम ही अनुसूचित जातीतली होती तर विवेक तिवारी हा ब्राह्मण. त्यामुळे जर योगिताशी लग्न झाले तर आपल्या बहिणीशी कुणीही लग्न करणार नाही, अशी भीती विवेकला होती. त्यामुळेच विवेक आपला करुन नंतर आपल्याबरोबर लग्न करणार नाही, अशी शंका योगिताला आल्यामुळे ती त्याला वारंवार टाळत होती. मात्र योगिताने त्याला टाळायला सुरुवात केल्यानंतर सूडभावनेने पेटलेल्या विवेक तिवारीने तिला संपवण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

आगऱ्याच्या सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमधून या योगिताचे MBBS झाले होते. डॉ. योगिता गौतम ही मुळची दिल्ली येथे राहणारी असून तिचे आई, वडील देखील डॉक्टर आहेत. मंगळवार रात्रीपासून योगिता बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिचा फोनही स्विच ऑफ झाला होता. २००९ मध्ये योगिताने मुरादाबादच्या तीर्थंकर महावीर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. तेव्हापासून तिवारी आणि योगिताची ओळख होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -