घरदेश-विदेशIRCTC वर मिळेल स्वस्तात ट्रेन तिकीट; हा पर्याय वापरा

IRCTC वर मिळेल स्वस्तात ट्रेन तिकीट; हा पर्याय वापरा

Subscribe

तिकीट बुक करताना होणार आपल्या पैशांची बचत

ट्रेन बुक करताना नेहमीच सगळे स्वस्तातल्या पर्यायाची निवड करत असतात. मात्र ट्रेनची ही तिकीट बुक करताना आपल्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळे जे तिकीटाचे दर असतात त्यानुसारच त्याची किंमत द्यावी लागते. मात्र आता आयआरसीटीसीने आपल्या ग्राहकांना यासाठी एक चांगला पर्याय सांगितला आहे.

आयआरसीटीसीने सांगितल्या प्रमाणे, आता ग्राहक तिकीट बुक करताना आपल्या पैशांची बचत करू शकतात. यासंदर्भातील त्यांनी एक ट्विट देखील करत याची माहिची आपल्या ग्राहकांना दिली आहे. तिकीट काढताना ग्राहक डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करून शून्य पेमेंट गेटवे शुल्क वाचवू शकतात. मात्र यासाठी आयआरसीटीसीची एक अट आहे, ही बचत तुम्हाला १ लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवरच मिळू शकेल, असे IRCTCने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

असे करा तिकीट बुक

जेव्हा तुम्ही आयआरसीटीसीवरून तिकीट बुक करता त्यावेळी तिकिट बुकिंग करताना पेमेंटचा पर्याय येतो. तेव्हा तुम्ही तिकीट बुक करण्यासाठी डेबिट कार्डचा पर्याय निवडून तिकीट बुक करू शकतात. याद्वारे आपण शून्य पेमेंट गेटवे शुल्काद्वारे तिकिटांवरील कर आणि इतर शुल्काची बचत देखील करू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -