घरट्रेंडिंगआता घर बसल्या उघडता येणार 'इंडिया पोस्ट पेमेंट बँके'चं खातं; जाणून घ्या...

आता घर बसल्या उघडता येणार ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँके’चं खातं; जाणून घ्या Online प्रक्रिया

Subscribe

गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोना महामारीने कहर केले आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी किंवा तो टाळण्यासाठी बँकेने त्यांचे आर्थिक व्यवहार शक्यतो डिजिटल पद्धतीने म्हणजेच ऑनलाईन करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ने देखील आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी बचत खाते उघडण्याची सेवा डिजिटल माध्यमातून सुरू केल्याचे सांगितले आहे. यानुसार, आता तुम्ही IPPB च्या मोबाईल अॅप द्वारे घर बसल्या तुमचे खाते उघडू शकतात. याशिवाय, पोस्ट ऑफिस खातेधारक या अॅपद्वारे इतर बँकिंग व्यवहार सहजपणे करू शकतात. 18 वर्षाच्या कोणताही भारतीय नागरिकाला IPPB मध्ये बचत खाते उघडायचे असल्यास तो शकतो.

IPPB च्या अंतर्गत उघडलेले बचत खाते फक्त एका वर्षासाठी वैध असणार आहे. तुम्हाला खाते उघडल्यानंतर एक वर्षाच्या आत बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे. त्यानंतर त्याचे नियमित खात्यात रूपांतरित करण्यात येईल. तुमचे बचत खाते उघडण्यासाठी तुम्हाला काही सोप्या पद्धतीला फॉलो करावे लागेल. जाणून घ्या सविस्तर…

- Advertisement -

जाणून घ्या प्रक्रिया

  • IPPB या मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून बचत खाते उघडण्यासाठी प्रथम तुम्हाला IPPB हे मोबाईल अॅप डाऊन करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला हे अॅप ओपन करून ‘Open Account’ च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या पर्यायावर गेल्यावर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक तेथे नमूद करणं आवश्यक आहे.
  • पॅन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.
  • ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचे नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि नॉमिनी यांसारखे तपशील भरावे लागतील.
  • ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुमचे बचत खाते उघडले जाईल.
  • मोबाईल अॅपद्वारे या बँक खात्यात कमी वेळात सहज प्रवेश मिळवता येतो.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘आयपीपीबी’ ही देशातील तिसरी पेमेंट बँक आहे. यापूर्वी एअरटेल आणि पेटीएम या दोन कंपन्यांनी पेमेंट बँकेची सुरुवात केली आहे. पेमेंट बँकेतील बचत खात्यामध्ये कुणीही व्यक्ती किंवा छोटे व्यावसायिक एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकतात.

पेमेंट बँक म्हणजे काय?

पेमेंट बँक म्हणजे आकाराने छोट्या बँका होय. या बँका शक्यतो मोबाइल फोनच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत विविध सेवा पोहोचवतात. बँकेकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला प्रत्यक्ष बँकेच्या शाखेपर्यंत जाण्याची आवश्यकता भासत नाही.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -