१० वर्षे जुनी कार होणार नाही भंगार, इलेक्ट्रिक कार म्हणून करु शकता वापर

you convert your ten year old diesel car engine car into electric car
१० वर्षे जुनी गाडी होणार नाही भंगार, इलेक्ट्रिक कार म्हणून करा शकता वापर

गेल्या काही दिवसांमध्ये दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होतेय. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास अनेक अडचणी येत आहे. वाढत्या वायू प्रदुषणामुळे नागरिकांना सतत रुग्णालयात खेटा घालाव्या लागत आहेत. अशातच दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांनी १० वर्षे जुन्या डिझेलवर चालणाऱ्या चार चाकी गाड्या वापरण्यासाठी परवानगी दिली आहे. यासंदर्भात कैलाश गहलोत यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले की, दिल्लीत आत्ता इंटरनॅशनल कंब्शन इंजिनच्या (ICE) इलेक्ट्रिक रेट्रोफिटिंग तयार करत आहोत. जर तुमचे डिझेलवर चालणारे वाहन कंडिशनमध्ये असेल तर त्याला इलेक्ट्रॉनिक इंजिनमध्ये बदलता येईल. लवकरचं विभाग इलेक्ट्रिक किट बनवणाऱ्या कंपन्यांची लिस्ट जाहीर करणार आहे. या माध्यमातून १० वर्षे जुन्या डिझेलवर चालणाऱ्या गाड्या इलेक्ट्रिक वाहन म्हणून वापरु शकतो.

अशी असेल प्रक्रिया

परिवहन विभागाने परवानगी दिल्यानंतर चालक आपल्या डिझेल कारमध्ये इलेक्ट्रिक किट बसवू शकतात. यासाठी टेस्टिंग एजेन्सी डिझेल कार इंजिनचे फिटनेस चेक करेल यानंतरच परवानगी देईल. एकदा परवानगी मिळाली की, वाहन चालक आपल्या वाहनातील इंजिन चेंज करु शकतात.

खर्च किती लागेल?

डिझेल इंजिन असलेल्या कारचे इलेक्ट्रिक रेट्रोफिटिंगसाठी ऑफिशियल रेड जाहीर करण्यात आलेले नाहीत. परंतु मीडिया रिपोर्टनुसार, डिझेल वाहनात इलेक्ट्रिक किट बसवण्यासाठी जवळपास ४ ते ६ लाख रुपये खर्च येईल. यासाठी डिझेल कारमधील इंजिन काढून त्याजागी एक इलेक्ट्रिक मोटार, हाय-वोल्टेज वायरिंग सर्किट आणि कंट्रोल युनिट फिट केले जाईल, यासाठी अधिक पैसा खर्च होऊ शकतो. या कारमध्ये इलेक्ट्रिक इंजिन फिट केल्यानंतर घरात चार्जिंगसाठी सेटअप इंस्टॉल करावा लागेल.