Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश ऑनलाईन ड्रायव्हिंग लाइसन्स काढताय ? प्रक्रियेत वाढले आणखी टप्पे

ऑनलाईन ड्रायव्हिंग लाइसन्स काढताय ? प्रक्रियेत वाढले आणखी टप्पे

Related Story

- Advertisement -

केंद्र सकारने नुकतेच ड्रायव्हिंग लाईसन्ससह आरटीओसंबंधीत १८ सेवा ऑनलाईन केल्या. त्यामुळे असे म्हटले जात होते की, ड्रायव्हिंग लाईसन्स काढण्यात आता अडचणी येणार नाही. मात्र असे नसून, ऑनलाईन ड्रायव्हिंग लाईसन्स काढण्यासाठी आता टेस्टसह अनके पॅरामीटर जोडण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाईन ड्रायव्हिंग लाईसन्स काढण्याच्या प्रक्रियेतील टप्पे आणखी वाढले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत सादर केलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हिंग लाईसन्स अर्जदारास कमीत कमी ६९ टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. यानंतरच संबंधीत अर्जदार पुढील टेस्टसाठी पात्र ठरवला जाईल. तसेच अर्जदारास स्पेशल स्किल्सचा वापर करत मर्यादित अंतरावर गाडी लेफ्ट-राईट रिवर्स करत चालवणे गरजेचे असणार आहे. अर्जदारास गाडी अचूक रिवर्स घेता येणे महत्त्वाचे असणार आहे.

- Advertisement -

या ऑनलाईन ड्रायव्हिंग लाईसन्स टेस्टदरम्यान अर्जदारास एक व्हिडिओ लिंक दिली जाईल. ज्यामध्ये ड्रायव्हिंग टेस्टबाबत संपूर्ण माहिती असणार आहे. त्याचबरोबर ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकवर एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून अर्जदारास सर्वात पहिला टेस्टचा डेमो दाखवला जाईल.

देशात वाढत्या कोरोना संक्रमणामुळे रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने ड्राईव्हिंग आणि आरसीसंबंधीत कागदपत्रांसाठी मुदत ३० जूनपर्यंत वाढवून दिली आहे. यामुळे तुमचे गाडीसंबंधीत कागदपत्रांची मुदत संपली असली तरी ती कागदपत्रे ३० जूनपर्यंत ग्राह्य धरली जाणार आहेत.


- Advertisement -

 

- Advertisement -