घरट्रेंडिंगOne Nation One Ration Card Scheme: नेमकी काय आहे 'वन नेशन, वन...

One Nation One Ration Card Scheme: नेमकी काय आहे ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना, जाणून घ्या

Subscribe

कोरोनामुळे बर्‍याच लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत. ग्रामीण भागातील कामांवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने स्थलांतरित नागरिकांना रेशन देण्यासाठी ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना सुरू केली आहे. याअंतर्गत आता आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या लोकांना गहू, तांदूळ यांसारखे आवश्यक धान्य अत्यंत कमी किंमतीत दिले जाऊ शकते. कोणताही व्यक्ती शिधापत्रिकाधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे एखाद्या व्यक्ती राहत असलेल्या मूळ राज्याव्यतिरिक्त ती व्यक्ती दुसऱ्या राज्यातूनही रेशन घेऊ शकते.

केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत देशभरात एक राष्ट्र-एक रेशन कार्ड योजना लागू केली आहे. त्याअंतर्गत आता कार्ड धारक देशातील कोठूनही रेशन घेऊ शकणार आहे. त्याअंतर्गत देशभरातून सुमारे ५.२५ लाख रेशन दुकानांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत आता गरजूंना रेशन सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व अपंगांना त्यांच्या घरी रेशन दिले जात आहे.

- Advertisement -

असा घ्या या योजनेचा लाभ

ही योजना बायोमेट्रिक प्रणालीवर आधारित आहे. याद्वारे, रेशन कार्ड धारकाची ओळख त्याचे डोळे आणि हाताच्या अंगठ्याच्या ठशाने होते. देशभरातील ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या योजनेशी जोडले गेले आहेत. जर रेशनकार्डधारक दुसर्‍या शहरात जात असेल तर तो ‘माय रेशन अॅप’ वर स्वत: ची नोंदणी करून माहिती देऊ शकतो. नोंदणी केल्यानंतर त्याला तेथे रेशन या योजनेद्वारे उपलब्ध होईल.

‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत एकाच रेशन कार्डचा वापर देशभरात कुठेही करता येणार आहे. कोणत्याही राज्यातील रेशन कार्डधारक, कोणत्याही अन्य राज्यातील रेशनच्या दुकानातून कमी किंमतीत स्वस्त धान्य खरेदी करु शकतात. या योजनमुळे भ्रष्टाचारावर लगाम बसेल. तसेच रोजगार किंवा इतर कोणत्याही कारणास्तव एका ठिकाणाहून, दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या गरीबांना अनुदानित रेशन नाकारले जाणार नाही, यापासून त्यांना वंचित राहावे लागणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रेशन कार्ड धारकांना पाच किलो तांदुळ तीन रुपये किलोच्या दरात आणि गहू दोन रुपये किलोने मिळणार आहे. रेशन कार्डवर एक स्थानिक भाषा आणि दुसरी हिंदी किंवा इंग्रजी अशा दोन भाषा असणार आहेत.

या योजनेअंतर्गत होणारे फायदे 

  • या योजनेचा सर्वाधिक फायदा गरीबांना होणार आहे
  • एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याऱ्यांना फायदा होईल
  • बनावट रेशन कार्ड तयार करण्यावर रोख लावण्यात येईल
  • सर्व रेशन कार्ड आधार कार्डशी जोडण्यात येण्याची आणि पॉइंट ऑफ सेल मशीनद्वारे धान्याचं वितरण करण्याची व्यवस्था देखील असणार आहे

Covid-19 Vaccine: …म्हणून ब्राझीलने Covaxin ची डील केली सस्पेंड; ३२ कोटी डॉलरचा होता करार
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -