Monday, June 21, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग जगभरात थैमान घालणाऱ्या Covid-19 व्हायरसचे एकूण वजन किती आहे? वाचा सविस्तर

जगभरात थैमान घालणाऱ्या Covid-19 व्हायरसचे एकूण वजन किती आहे? वाचा सविस्तर

Related Story

- Advertisement -

गेल्या एक ते दीड वर्षांपासून देशात कोरोना विषाणू जगभर पसरलेला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लाखो लोक संक्रमित आहेत. जर या सर्व कोरोनाच्या विषाणूला एकाच ठिकाणी जमा केले असता त्यांचे वजन किती असू शकेल? नुकतीच एक माहिती समोर आली आहे ती म्हणजे, शास्त्रज्ञांनी जगात उपस्थित असलेल्या सर्व कोरोना विषाणूंचे वजन शोधून काढले आहे. संपूर्ण जगावर कोणत्या प्रकारच्या जैविक शस्त्राने हल्ला करण्यासाठी किती रासायनिक, जीवाणू किंवा विषाणू आवश्यक असतील याची कल्पना येते. शास्त्रज्ञांनी त्यांच्या नवीन अभ्यासात असे सांगितले की, ते एका नवजात मुलाच्या वजनाइतके किंवा एका सफरचंदाच्या वजनादरम्यान आहे.

इस्त्राईलच्या विझमॅन इंस्टीट्यूट ऑफ सायन्सच्या शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला आहे. जगातील कोरोना विषाणू संक्रमित लोकांच्या नमुन्यांमधून त्याने ही गणना केली असल्याचे सांगितले जात आहे. कोरोना विषाणूने या महामारीदरम्यान कोणत्याही जागी साधारण १० लाख ते १ कोटी लोकांना संक्रमित केले आहे. त्यानुसार, शास्त्रज्ञांनी जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या वजनाचा अभ्यास केला आहे. विझमॅन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स येथे डिपार्टमेंट ऑफ प्लांट अँड एनवॉयरमेंटल सायन्सेस प्राध्यापक आणि या अभ्यासाचे ज्येष्ठ संशोधक रॉन मिलो म्हणाले की, जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचे वजन ०.१ ते १० किलो असू शकते. असे असले तरी कमी वजन असणाऱ्या संख्येच्या व्हायरसचा अर्थ असा नाही की ते धोकादायक नाहीत.

- Advertisement -

रॉन आणि त्याच्या टीमने फुफ्फुस, टॉन्सिल, लिम्फ नोड्स आणि पाचन तंत्रामध्ये कोरोनाव्हायरसचे प्रमाण मोजले. यानंतर, त्याने प्रति ग्रॅम मध्ये या कोरोना विषाणूच्या कणांची गणना केली. त्यानंतर त्याची तुलना मानवी पेशींच्या वजनाशी केली गेली. ज्यामुळे मानवांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूच्या कणांचे संपूर्ण वजन समजणे शक्य झाले. यामध्ये कमी वजनाच्या विषाणूचा अर्थ असा आहे की, त्या वेळी कोरोनाची संख्या कमी होती. १० किलो वजनाचा अर्थ असा होतो जेव्हा जगात कोरोना विषाणू अगदी शिगेला पोहोचला होता.

- Advertisement -

मागील गणनेमध्ये कोरोना विषाणूच्या व्यासावर आधारित व्हायरस कणांचे वजन १ फेमटोग्राम होते. प्रत्येक विषाणूच्या कणांच्या वस्तुमानांची गणना माणसाच्या शरीरात असलेल्या व्हायरसच्या अस्तित्वाच्या आधारे केली जाते, ते १ मायक्रोग्राम ते १० मायक्रोग्राम दरम्यान येत होते. म्हणजेच, जेव्हा कोरोना विषाणू कहर सुरू होता, तेव्हा त्याचे वजन १० मायक्रोग्राम होते आणि जेव्हा कोरोना नियंत्रणात आला म्हणजे प्रादुर्भाव कमी होत गेला तेव्हा ते १ मायक्रोग्राम होते. हे आकडे वजा करून, शास्त्रज्ञांनी जगभरातील सर्व संक्रमित लोकांच्या सरासरी वजनाची गणना केली. त्यानंतर, या आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूचे वजन मोजले गेले. त्यानंतर त्यांची संपूर्ण संख्या १ फेमेटोग्राम वजनाने गुणाकार केली जाते. हे देखील संशोधनाच्या आकडेवारीतून समोर आले. यासह हे देखील कळले की कोरोना विषाणू आपल्या शरीरात किती वेगवान पसरतो.


Corona Vaccine सर्टिफिकेटमध्ये नाव, बर्थ डेटमध्ये झालीयं चुक, CoWin पोर्टलवरुन ‘असे’ करा बदल

 

 

- Advertisement -