घरदेश-विदेशLok Sabha 2024 : निवडणुकीपर्यंत तू घर सोड, नाहीतर मी सोडतो; काय...

Lok Sabha 2024 : निवडणुकीपर्यंत तू घर सोड, नाहीतर मी सोडतो; काय आहे प्रकरण?

Subscribe

नवी दिल्ली : सध्या देशभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची धावपळ सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने उमेदवारांचा प्रचार, रोड शो, प्रचार सभा यामुळे वातावरण चांगलंच तापलेलं आहे. मात्र, बालाघाटमधील एका काँग्रेस आमदाराच्या घरापर्यंत हा राजकीय संघर्ष पोहोचला आहे. या घरातील पती आणि पत्नी परस्परांविरोधात निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे नवऱ्याने बायकोला घर सोडून जाण्याचा अजबच पर्याय दिला आहे.

मध्यप्रदेशच्या बालाघाट-सिवनी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, भाजप, बसपा आणि इतर अपक्ष असे मिळून एकूण 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथील काँग्रेस आमदार अनुभा मुंजारे या चांगल्याच धर्मसंकटात सापडल्या आहेत. कारण, अनुभा या काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत, तर त्यांचे पती कंकर मुंजारे हे बसपाचे उमेदवार आहेत. निवडणूक होईपर्यंत कंकर यांनी पत्नीला घर सोडण्याचं आवाहन केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : राज्यातील 48 जागा जिंकण्याचा निर्धार; दिनेश शर्मांकडून विश्वास व्यक्त

वाद घरापर्यंत का पोहोचला?

हा वाद घरापर्यंत पोहोचण्यामगे तसंच कारण घडलं आहे. बालाघाटच्या काँग्रेस आमदार अनुभा मुंजारे यांचे पती कंकर मुंजारे हे बसपाच्या तिकीटावर लोकसभा लढत आहेत. पत्नीच्या पक्षाची आणि आपल्या पक्षाची विचारधारा वेगवेगळी असल्याने कंकर मुंजारे यांनी आपल्या पत्नीला घरापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच पत्नीने ऐकलं नाही तर आपण स्वत: घर सोडू, असं कंकर मुंजारे यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांच्या वक्तव्यानंतर या पती-पत्नीमध्ये वादाची ठिणगी पडली. जीतू पटवारी यांनी शक्ति प्रदर्शनवेळी केलेलं वक्तव्य कंकर मुंजारे यांना जिव्हारी लागलं आहे. पतीच्या या आवाहनामुळे काँग्रेस आमदार अनुभा मुंजारे अडचणीत सापडल्या आहेत.

- Advertisement -

काँग्रेसचे उमेदवार सम्राट सरस्वार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी भर मंचावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी तिथे उपस्थित काँग्रेस आमदार अनुभा मुंजारे यांचं नाव घेत म्हटलं की, वहिनी, तुमचे पती बसपा उमेदवार कंकर मुंजारे यांना निवडणुकीत हरवायचं आहे. जीतू पटवारी यांचं हे वक्तव्य कंकर मुंजारे यांना जिव्हारी लागलं आहे. यामुळे ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. कंकर मुंजारे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. भाजप सोडून काँग्रेस माझ्या पराभवाच्या मागे लागली आहे. यावेळी त्यांनी राजकीय सिद्धांताचा उल्लेख करत पत्नीला घर सोडण्याचं आवाहन कंकर यांनी केलं.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपाकडेच; नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात

अनुभा मुंजारे यांचे म्हणणे काय?

पतीच्या या आवाहनानंतर आमदार अनुभा मुंजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझं घर आणि राजकीय जबाबदारी मी चांगल्याप्रकारे हाताळेन”, असं अनुभा मुंजारे म्हणाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी एकाच घरात राहून वेगवेगळ्या विचारधारांच्या पक्षांसोबत निवडणूक लढवली होती. “गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत आम्ही एकत्र राहिलो होतो. तेव्ही मी बालाघाटमधून काँग्रेस उमेदवार होते. तर ते परवाडा येथून गोंडवाना गणतंत्र पक्षाचे उमेदवार होते. एकत्र राहूनही निवडणूक लढवता येते, मग ते आता वेगळं राहण्याचा विचार का करत आहेत, हे मला समजत नाही, असं अनुभा मुंजारे म्हणाल्या.

कंकर मुंजारे 45 वर्षांपासून राजकारणात

माजी खासदार कंकर मुंजारे हे गेल्या 45 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. तर अनुभा मुंजारे या गेल्या 30 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. मुंजारे दाम्पत्याने क्रांतिकारी पक्ष, समाजवादी, बीएसपी या पक्षांमध्ये एकत्र काम केलंय. पण 2023 च्या विधानसभा निवडणुकीवेळी अनुभा मुंजारे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत बालाघाट येथून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -