घरCORONA UPDATE३१ मेपर्यंत बँक खात्यात ३४२ रुपये तरी ठेवणे गरजेचे, जाणून घ्या कारण

३१ मेपर्यंत बँक खात्यात ३४२ रुपये तरी ठेवणे गरजेचे, जाणून घ्या कारण

Subscribe

देशातील गेल्या दोन वर्षापासून कोरोना विषाणूने हैदोस घातला आहे. यात उद्योगधंदे ठप्प झाल्यामुळे अनेकांना अगदी मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना पगारही वेळेवर मिळू शकला नाही किंवा पगार कपातीचा सामना करावा लागला. दरम्यान अनेकांनी आपल्या हक्काचा नोकऱ्या गमावल्या. यामुळे घर कसे चालवायचे असा प्रश्न अनेक गरीब कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे. या परिस्थिती अनेकांची बँकेतही रिकामी झालीत. परंतु ३१ मेपर्यंत जर तुम्ही बँकेच्या खात्यात ३४२ रुपये ठेवला नाही तर ४ लाखांपर्यंतचा विम्याचे नुकसान सहन करावे लागणार आहे. जाणून घेऊ या यामागे नेमके काय कारण आहे.

कसे होऊ शकते नुकसान?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सुरुवातीच्या कार्यकाळात नागरिकांसाठी दोन विमा योजना सुरु केल्या होत्या. पहिली म्हणजे पंतप्रधान जीव ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY). यातील पंतप्रधान जीव ज्योती विमा योजनेअंतर्गत ५५ वर्षापर्यंतच्या नागरिकांना लाईफ कव्हर मिळते. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव या योजनेतून विमा उतरवणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा वारसदारास २ लाख रुपयांचे लाईफ कवर मिळते.

- Advertisement -

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा नातेवाईकास किंवा अपघातामुळे अपंग झालेल्या व्यक्तीस २ लाख रुपये दुर्घटना विमा मिळतो. तर काही प्रमाणात विकलांग आलेल्या व्यक्तीस १ लाख रुपयांपर्यंत कवर मिळते. गरीबांना लक्ष केंद्रित करत या विम्याचा प्रीमियम खूप कमी ठेवण्यात आले आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विम्यासाठी ३३० आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी १२ रुपये दरवर्षी भरणे अनिवार्य आहे. याचा अर्थ या दोन्ही योजनांसाठी ३४२ रुपयांची एकूण प्रीमियम रक्कम भरल्यास तुम्हाला ४ लाख रुपयांचे विमा कवर मिळते.

- Advertisement -

वर्षाचा आधारावर होतात विमा पॉलिसी रिन्यू

दरम्यान ३४२ रुपयांचा या दोन्ही विमा पॉलिसी टर्म इंश्युरन्स पॉलिसीप्रमाणे आहेत. या विमा पॉलिसी दरवर्षी ३१ मे पर्यंत लॅप्स होतात. त्य़ामुळे या पुन्हा सुरु ठेवण्यासाठी तुम्हाला बँक अकाउंटमध्ये पैसे ठेवणे गरजेचे आहे. ज्यामुळे या विमा पॉलिसी  पुन्हा सुरु राहतील. परंतु असे न केल्यास तुमची पॉलिसी बंद होईल आणि ती पुन्हा नव्याने सुरु करावी लागेल.

म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला शून्यापासून सुरुवात करावी लागेल. परंतु जर तुम्ही बँक खात्यात ३४२ रुपये ठेवलात तर तुमची पॉलिसी पुढील वर्षासाठी आपोआप सुरु होईल. विमा वर्षाच्या कोणत्याही तारखेला खरेदी केला जातो, परंतु तो 31 मे पर्यंत वैध असतो. आपण 31 मे नंतरही या पॉलिसी सुरु ठेवण्यासाठी पुढील वर्षाच्या त्याच तारखेपर्यंत ही योजना वैध असते.

दोन्ही योजनांविषयी

18 ते 50 वर्षे वयोगटातील लोक प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत सहभागी होऊ शकतात. त्याचवेळी, 70 वर्षापर्यंतचे लोक पंतप्रधान सुरक्षा विमा खरेदी करु शकतात. या योजनेत सामील होण्यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे. तुम्ही खासगी ते सरकारी बँकेत नेट बँकिंगचा वापर करुन विमा घेऊ शकता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -