Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश ...याचा एकदा विचार करावा, मोदींच्या जाहिरातीवरून जितेंद्र आव्हाडांचा भाजपाला सल्ला

…याचा एकदा विचार करावा, मोदींच्या जाहिरातीवरून जितेंद्र आव्हाडांचा भाजपाला सल्ला

Subscribe

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधकांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीत ही लढत होणार आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. त्याच अनुषंगाने भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो ट्वीट करून या निवडणुकांबाबत भाष्य केले आहे आणि त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला ‘पुन्हा विचार करण्या’चा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधक पुन्हा एकवटले आहेत. देशात हुकूमशाही येत असल्याचा आरोप करत विरोधकांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी एकजूट दाखविली आहे. 23 जून 2023 रोजी विरोधकांची पहिली बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली. त्या बैठकीला 15 विरोधी पक्ष उपस्थित होते. त्यानंतर दुसरी बैठक 18 जुलै 2023 रोजी बंगळुरूमध्ये झाली. या बैठकीत 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे ‘इंडिया’ असे नामकरण करण्यात आले. आता मुंबईत या आघाडीची तिसरी बैठक झाली. ग्रॅण्ड हयात या पंचतारांकित ह़ॉटेलमधील बैठकीत आघाडीच्या समन्वय समितीबरोबरच इतर काही समित्यांबाबत जाहीर करण्यात आल्या.

हेही वाचा – पाच वर्षं लूट, निवडणुकावेळी सूट… ही नीती आम्हाला मान्य नाही – उद्धव ठाकरे

- Advertisement -

तर दुसरीकडे, भाजपाने या बैठकीवरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. ही ‘घमंडियां’ची बैठक असल्याचे म्हटले आहे. सत्ता काबिज करणे हेच ‘घमंडिया’ आघाडीचे लक्ष्य आहे. घमंडिया टोळीला फक्त स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा विकास करायचा आहे. त्यांच्या डोळ्यात भाजपाने सुरू केलेली विकासकामे आणि भारताची प्रगती खुपत आहेत. मात्र तरीही, पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा सत्तेवर येतील, असा विश्वास भाजपाने व्यक्त केला आहे. याशिवाय, भाजपाने दोन दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांचा एक फोटो शेअर करत, ‘पंतप्रधान मोदी यांचा पराभव होऊ शकतो, असे विरोधकांना वाटते. स्वप्न पाहत राहा! टर्मिनेटर नेहमीच जिंकतो.’ असे म्हटले आहे.

हेही वाचा – खोटं बोलून, अफवा पसरवून मोदी सत्तेत आले; लालूप्रसाद यादवांची टीका

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा फोटो रीट्वीट केला आहे. ‘टर्मिनेटर’ याचा मराठीतील अर्थ विद्ध्वंस करणारा असा होतो. भाजपाला खरंच आपल्या नेत्याला ‘टर्मिनेटर’ म्हणायचे आहे का? याचा एकदा विचार करावा, असा सल्ला डॉ. आव्हाड यांनी दिला आहे.

- Advertisment -