घर ताज्या घडामोडी दिल्लीत तरुणीची क्रूरपणे हत्या जीपने 13 किमी फरफटत नेले, 5 जणांना अटक

दिल्लीत तरुणीची क्रूरपणे हत्या जीपने 13 किमी फरफटत नेले, 5 जणांना अटक

Subscribe

नवी दिल्ली- एका तरुणीच्या क्रूर हत्येमुळे राजधानी दिल्ली नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हादरली आहे. दिल्लीतील कांजवाला येथे बोलेरो जीपने एका तरुणीच्या स्कुटीला धडक देऊन तिला खाली पाडले. जीपला अडकलेल्या या तरुणीला तब्बल 13 किलोमीटर फरफटत नेले. यात तरुणीचा मृत्यू झाला.

तिच्या अंगावरील सर्व कपडे फाटले. या तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळल्यानंतर पोलिसांनी तपास करत जीपमधील 5 आरोपींना अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. शनिवारी मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला आयोगानेही याप्रकरणी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

थर्टी फर्स्टच्या रात्री नशेत असलेल्या जीपचालकाने एका तरुणीच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. ही तरुणी कामावरून घरी जात असल्याचे म्हटले जात आहे. अपघातानंतर तरुणी वाहनात अडकली. तरीही जीपचालकाने या तरुणीला 13 किलोमीटर फरफटत नेले.

एक जीप मृतदेहाला फरफटत कुतूबगढच्या दिशेने जास्त असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी जीपचा शोध घेतल्यानंतर ती जीप सुलतानपुरी इथे बिघडलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांना मृत मुलीची स्कुटीही सापडली आहे. यानंतर पोलिसांनी तपास करत जीपमधील 5 जणांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या टीमने घटनास्थळाहून फॉरेन्सिक पुरावेही गोळा केले आहेत, तर तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -