घरताज्या घडामोडीस्पेनचा ६ महिन्यांचा lockdown संपताच, Kissing celebration...

स्पेनचा ६ महिन्यांचा lockdown संपताच, Kissing celebration…

Subscribe

स्पेनमध्ये जवळपास देशातील १७ प्रदेशातील तब्बल lockdown तब्बल सहा महिन्यांनी संपुष्टात आला. देशात कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यानंतर आणि लसीकरणाच्या मोहीमेने वेग घेतल्यानंतर स्पेनमध्ये लसीकरणाच्या मोहीमेनेही वेग घेतला आहे. तब्बल सहा महिन्यांचा लॉकडाऊन संपल्याची घोषणा होताच एकच जल्लोषाची सुरूवात झाली. स्पेनची राजधानी असलेल्या मॅड्रिडमध्ये तरूणाईने एकच जल्लोष करत डान्सला सुरूवात केली. तर अनेकांनी गाण गात नव्या वर्षाच स्वागत केले. अनेक दिवस लॉकडाऊनच्या कठोर निर्बंधांमुळे याठिकाणी कोरोनाचा संसर्ग कमी झाला. लॉकडाऊन शिथिल होताच अनेक तरूणांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला. तर तरूणाईने एकमेकांना रस्त्यावरच किस करत नव्या वर्षाचे स्वागत करत, कोरोना व्हायरसलाही निरोप दिला.

spain celebration

- Advertisement -

बर्सिलोनातही अनेकांनी समुद्र किनारी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जाण पसंत केले. अनेक कपल्स या लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर रस्त्यावर एकमेकांना किस करताना दिसले. हजारोंच्या संख्येने या निमित्ताने गर्दी झाली होती.

spain celebration

- Advertisement -

विनामास्क असे हे सेलिब्रेशन झालेले असतानाच मोठा पोलिस बंदोबस्तही याठिकाणी तैनात करण्यात आला होता. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटाही रस्त्यावर पहायला मिळाला. द आयरीश सन या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

lockdown over in spain

नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा नको…

कोरोनाच्या निमित्ताने स्पेनमध्ये कडक निर्बंध शिथील करण्यात आल्यामुळे आता एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. तसेच बार आणि रेस्टॉरंटही रात्री ११ पर्यंत खुले ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पण एकाच टेबलवर चार लोकच बसण्याचे नियम लागू आहेत. तसेच रेस्टॉरंट आणि बारमध्ये अवघ्या ३० टक्के क्षमतेने प्रवेश देण्याच्या सूचनाही आहेत.

spain lockdown

गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२० मध्ये याठिकाणी लॉकडाऊनला सुरूवात झाली होती. देशव्यापी असा लॉकडाऊन याठिकाणी जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये रात्री ११ नंतर कर्फ्युचा नियमही लागू करण्यात आला होता. अजुनही लोकांनी गर्दी करू नये असे सांगितले जात आहे, पण नियमामुळे लोकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत असल्याचे न्यायालयाने दुसरीकडे स्पष्ट केले आहे.

spain 6 month lockdown

काही ठिकाणी रात्री १२ ते ६ वाजेपर्यंतचा कर्फ्युचा नियम मात्र कायम आहे. कोरोनामुळे एकट्या स्पेनमध्ये जवळपास ७९ लाख इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. त्यामध्ये श्वसनाच्या त्रासाने झालेल्या मृत्यूचा आकडा हा ३५ लाख इतका होता.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -