तुमचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा

लोखंडी सळ्यांचा भाव दोन महिन्यांपूर्वी गगनाला भीडला होता. मार्च महिन्यामध्ये काही जागी तर ८५ हजार प्रतिटन भाव होता तर आता सळ्यांचा दर ४५ हजार रुपये प्रति टन झआला आहे.

nirmala sitharaman annonced 25000 crore for the construction of the center for construction project
तुमचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा

राज्यातील सर्वसामान्य नागरिकाचे आपलं स्वतःच घर खरेदी करण्याचे किंवा स्वप्नातील घर बांधता येणार आहे. आपल्या स्वप्नातील घर व्हावे असे सर्वांनाच वाटत असते. घर खरेदी करण्यासाठी तसेच घरासाठी आपली स्वकमाई खर्ची होते. अनेक जण मेहनत करुन घर खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशामध्ये लोखंड सळी, लोखंड, सिमेंट आणि घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परंतु सरकारने स्टीलवरील निर्यात शुल्कात वाढ केली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये स्टीलच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. लोखंडी सळ्यांच्या दरात रोज घसरण होताना दिसत आहेच पण विटा आणि सिमेंटचे दरसुद्धा कमी होत आहेत.

सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी मदतच झाली आहे. घराच्या किमती अवाक्याबाहेर जात असताना तसेच लोखंडावर तसेच स्टीलची निर्यातीवर नियंत्रण केंद्र सरकारने आणले आहे. निर्यात शुल्कावर वाढ केल्यामुळे देशांतर्गत बाजारात त्याचा दर कमी झाला आहे. याचा फायदा घर खरेदीसाठी केला आहे. राज्यात मुंबईमध्ये ५५ हजार २०० रुपये प्रतिटन, नागपूरमध्ये ५१ हजार आणि जालनामध्ये ५४ हजार प्रतिटन दर आहे.

घर बांधण्यासाठी तसेच कंस्ट्रक्शन करण्यासाठी लोखंडी सळ्यांचा वापर मजबूतीसाठी करण्यात येतो. घरांचे छप्पर, बीम, कॉलम आणि घर बनवण्यासाठी सळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. तसेच घराचा बेस तयार करण्यासाठीसुद्धा सळ्यांचा वापर केला जातो. लोखंडी सळ्यांचा भाव दोन महिन्यांपूर्वी गगनाला भीडला होता. मार्च महिन्यामध्ये काही जागी तर ८५ हजार प्रतिटन भाव होता तर आता सळ्यांचा दर ४५ हजार रुपये प्रति टन झआला आहे.

केंद्र सरकारकडून स्टील निर्यात शुल्कात वाढ

सरकारने स्टीलच्या निर्यात शुल्कात वाढ केली आहे. एक्सपोर्ट ड्युटीमध्ये वाढ केल्यामुळे देशातील लोखांच्या दरांवर नियंत्रण मिळवता आले आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात लोखंड आणि स्टीलच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. फक्त लोकल नाही तर ब्रँडेड लोखंडी सळ्यांचे भावसुद्धा बाजारात कमी झाले आहेत. मार्च महिन्यात ब्रँडेड सळ्यांचा भाव १ लाख रुपये प्रति टन होता जो आता ८० ते ८५ प्रति टन झाला आहे.


हेही वाचा : गुजरातमध्ये तब्बल २५० कोटींचं ड्रग्ज जप्त, पाकिस्तान कनेक्शन आलं समोर