Valentine Day दिवशी प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकराने क्राईम शो पाहून घरावर घातला दरोडा

व्हेलेंटाईन डे दिवशी प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकराने अवलंबला गुन्हेगारीचा मार्ग

Youth held in Delhi for committing theft to 'marry his girlfriend on Valentine's Day'
Valentine Day दिवशी प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकराने क्राईम शो पाहून घरावर घातला दरोडा

व्हेलेंटाईन डे हा दिवस प्रत्येक कपलसाठी खूप खास दिवस असतो. कपल व्हेलेंटाईन डे खास बनवण्यासाठी एकमेकांना सरप्राईज देत असतात. त्यामुळे अनेक जण या दिवस आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करतात किंवा लग्न करतात. अशीच एका प्रियकराची प्रेयसीसोबत व्हेलेंटाईन दिवशी लग्न करण्याची इच्छा होती. पण लग्न करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे लवकरात लवकर पैसे जमा करण्यासाठी त्याने गुन्हेगारीचा मार्ग अवलंबला. टीव्हीवरचे क्राईम शो पाहून त्याने एका घरावर दरोडा टाकला आणि तो थेट लग्नाच्या मंडपात जाण्याऐवजी जेलमध्ये गेला. ही घटना दिल्लीत घडली आहे.

नक्की काय घडले?

दिल्लीतील लाहोरी गेट भागात राहणाऱ्या मोहम्मद फहीमुद्दीन नावाच्या व्यक्तीने १८ जानेवारी रोजी पोलिसात घरी चोरी झाल्याची तक्रार केली होती. त्याने सांगितले की, तो घटनेदिवशी कामावर निघून गेला होता. त्याची पत्नी घरी एकटीच होती. काही वेळात त्याची पतीसुद्धा घराला टाळा लावून आपल्या आईजवळ गेली. जेव्हा ती संध्याकाळी घरी परतली तर दरवाजाचा टाळा खुला होता. घरात गेल्यानंतर सर्व सामान अस्तावस्त झाल्याचे तिने पाहिले. तिला घरात चोरी झाल्याचे समजले. तिजोरीतील ३ लाख रुपये आणि सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन गायब झाले होते.

मग पोलिसांत तक्रार केल्यानंतर याप्रकरणाचा तपास सुरू झाला. सुरुवातीला तपासात पोलिसांना असे समजले की, ज्याप्रकारे चोरी करण्यात आली आहे, तो आरोपी घराच्या आजूबाजूच्या परिसरातील आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. उत्तर दिल्लीचे डीसीपी सागर सिंह कलसी यांनी सांगितले की, जवळपास २००हून अधिक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. हे सीसीटीव्ही फुटेज तपासताना एक संशयित नजरेस पडला. त्यानंतर पोलिसांनी मोहम्मद जैद नावाच्या व्यक्तीला अटक केली. जेव्हा पोलिसांनी मोहम्मद जैदची चौकशी केली, तेव्हा त्याने चोरी केल्याचे कबुल केले.

चौकशीत आरोपी मोहम्मद जैदने सांगितले की, ‘तो एका खासगी नोकरीत होता आणि त्याचा फक्त ८ हजार रुपये पगार होता. त्याचे एका मुलीवर जीवापाड प्रेम होते. व्हेलेंटाईन डे दिवशी तो तिच्यासोबत लग्न करू इच्छित होता. त्यामुळे त्याला लग्नासाठी जास्त पैशांची गरज होती. मग त्याने चोरीचा प्लॅनिंग केला. त्याने चोरी करण्यापूर्वी युट्यूबवर सावधान इंडिया क्राईम शो अनेकदा पाहिला. याशिवाय त्याने इतर क्राईम शो देखील पाहिले. त्यानंतर त्याने चोरी केली. घरावर दरोडा टाकण्यासाठी त्याने एक डझनहून जास्त चाव्या तयार केल्या होत्या. पोलिसांनी या आरोपीकडून २ लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन जप्त केला आहे.


हेही वाचा – धक्कादायक! रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्याने दिले चुकीचे इंजेक्शन; दुसऱ्या मिनिटाला चिमुरड्याने गमावला जीव