Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश फेसबुक लाईव्ह दरम्यान तरुणाची आत्महत्या

फेसबुक लाईव्ह दरम्यान तरुणाची आत्महत्या

पंजाबमध्ये एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या केली आहे.

Related Story

- Advertisement -

पंजाबच्या जालंधर येथील एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याअगोदर त्याने आपली समस्या सांगितली, त्यानंतर त्याने विष प्राषाण केले. विष प्राषाण केल्यानंतर त्याचा तडफडत मृत्यू झाला. ही सर्व घटना फेसबुकमध्ये लाईव्ह दिसत होती. आत्मत्या करणाऱ्या तरुणाचे नाव सुखविंदर सिंह असे आहे. आत्महत्या करण्यापुर्वी त्याने आत्महत्या करण्याचे कारणही सांगितले आहे. कुटुंबियांच्या जाचाला कंटाळून आपण ही आत्महत्या करत असल्याचे त्याने म्हटले आहे.

पोलिसांवरही केले आरोप

आत्महत्या करणाऱ्या तरुणाने पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहे. सोमवारी दुपारी शुखविंदरने फेसबुक लाईव्ह सुरु केले. त्यात त्याने आपले वडील, भाऊ, बहिन यांच्यापासून छळ होत असल्याचे म्हटले. याबाबत त्याने पोलिसांत देखील तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले. त्यानंतर त्याने फेसबुक लाईव्ह दरम्यान विषप्राशन करुन आत्महत्या केली. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेप्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सुखविंदरचे कुटुंबियांशी वाद झाला होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्याचे कुटुंबियांशी जमत नव्हते. या वादातूनच त्याने घर देखील सोडले होते, असे पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेबाबत बोलण्यास सुखविंदरच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे.


- Advertisement -

हेही वाचा – अहमदनगर : लष्कराच्या सरावतीत बॉम्ब फुटून दोन जण ठार

- Advertisement -