घरदेश-विदेशतेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसाठी YSR पक्षाच्या महिला नेत्याने खरेदी केले बूट

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसाठी YSR पक्षाच्या महिला नेत्याने खरेदी केले बूट

Subscribe

तेलंगणामधील व्हायएसआर तेलंगणा पक्षाच्या अध्यक्षा शर्मिला यांनी तेलंगणा राज्यामध्ये असलेल्या सध्याच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विद्यमान सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने शर्मिला यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासाठी चक्क बुटांची खरेदी केली.

YSR तेलंगणा पक्षाच्या अध्यक्षा शर्मिला यांनी विद्यमान सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. शर्मिला यांनी याबाबत म्हटले आहे की, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी राज्यातील जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे शर्मिला यांनी आता केसीआर यांना त्यांच्या पदयात्रेत सहभागी होण्याचे आव्हानही दिले आहे.

आश्वासन पूर्ण करण्यात केसीआर ठरले अपयशी
महत्वाचे म्हणजे तेलंगणामध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी व्हायएसआर तेलंगणा पक्षाच्या अध्यक्षा शर्मिला राज्यभर पदयात्रा काढणार आहेत. याबाबत म्हणताना शर्मिला म्हणाल्या की, गेल्या नऊ वर्षांत राज्यात असा एकही वर्ग नाही ज्याला या निरंकुश आणि अकार्यक्षम राज्य सरकारचा त्रास झालेला नाही. शेतकऱ्यांची दुर्दशा, तरुणांमध्ये असलेले प्रश्न, महिलांचे अनेक प्रश्न, शिक्षण या सर्वांबाबत केसीआर यांनी अनेक आश्वासने दिलेली होती. परंतु ही सर्व आश्वासने पूर्ण करण्यात केसीआर पूर्णतः अपयशी ठरले आहेत.

- Advertisement -

शर्मिला यांनी मुख्यमंत्र्यांसाठी खरेदी केले बूट
गुरुवारी व्हायएसआर तेलंगणा पक्षाच्या अध्यक्षा शर्मिला यांनी हैदराबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी बूट खरेदी केल्याचे सांगितले. पत्रकारांसमोर एका बॉक्समधून त्यांनी ते बूट बाहेर देखील काढले. तर त्या पुढे म्हणाल्या की, “मी केसीआर यांना माझ्यासोबत पदयात्रेत चालण्याचे आव्हान देते. मी त्यांना बुटांची एक जोड सुद्धा देते. त्यांनी माझ्यासोबत पदयात्रेत सहभागी व्हावे. जर राज्यात कोणतीच समस्या नाही दिसली तर मी राजकारणातून संन्यास घेईल. पण जर समस्या दिसल्या तर केसीआर यांना राजीनामा द्यावा लागेल आणि राज्यातील जनतेची माफी देखील मागावी लागेल.”

हेही वाचा – नाराजी नाट्यानंतरही मराठवाड्यात मविआने गड राखला, भाजपाला ‘अपक्ष’कडूनही धोबीपछाड

- Advertisement -

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वायएस राजशेखर रेड्डी यांच्या मुलीने यावेळी सांगितले की, जेव्हा तिने केसीआरचे अपयश आणि भ्रष्टाचार जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या पदयात्रेवर हल्ला करण्यात आला. वारंगलमध्ये केसीआरच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदयात्रेवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -