Nitin Kamath On Stock Market : मुंबई : गेले काही महिने शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच शेअर मार्केट अधिक पडण्याचे संकेत असून, यासंदर्भात झिरोधाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत यांनी काही अंदाज वर्तवले आहेत. शेअर बाजारातील या पडझडीचा ब्रोकिंग उद्योगावर मोठा परिणाम होत असल्याचे, कामत यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. शेअर बाजारात अजून किती घसरण होईल हे मी सांगू शकत नाही, पण ब्रोकिंग उद्योगाबद्दल मात्र मी सांगू शकतो. ट्रेडरची संख्या आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम हे दोन्ही सध्या मोठ्या प्रमाणात घसरण दिसते आहे. (zerodha ceo nithin kamath sounds alarm amid stock market crash)
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास 1.90 टक्क्यांची घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना जवळपास 9.5 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी मार्केटमध्ये झालेल्या घसरणीनंतर थोडीफार सुधारणा दिसल्याचे कामत म्हणाले. मात्र, सध्या मार्केट दोलायमान आहे. त्यामुळे ते ज्याप्रमाणे वर गेले होते तसे ते अजून कोसळू शकेल असेही, कामत यांनी म्हटले आहे. त्यामुळेच ट्रेडरची संख्या आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम यात सध्या मोठ्या प्रमाणात घसरण दिसते आहे.
ब्रोकर्सचे व्यवहार 30 टक्क्यांहून अधिक कमी झाले आहेत. ट्रू-टू या मार्केटच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, व्यवसाय सुरू झाल्यापासून 15 वर्षात आम्ही पहिल्यांदाच व्यवसायात घसरण अनुभवतो आहोत. यावरूनच भारतीय बाजारात किती उलथापालथ सुरू आहे, हे लक्षात येते.
हेही वाचा – Sunil Gavaskar : ज्या भारतावर टीका करता त्याच्याच जीवावर तुमची…, इंग्लंडच्या खेळाडूंना गावस्करांनी सुनावले
कामत यांनी आपल्या ट्वीट सोबत एक तक्ता देखील शेअर केला आहे. त्यात इक्विटी टर्नओव्हरमध्ये एकेकाळच्या सर्वाधिक 1.4 लाख कोटी रुपयांमध्ये 42 टक्क्यांनी घट होऊन ते 1 लाख कोटींपेक्षाही खाली आले आहे. तर एनएसईमध्ये ऑप्शन टर्नओव्हर आपल्या एकेकाळच्या सर्वाधिक टर्नओव्हरपेक्षा 46 टक्क्यांनी घटला आहे. 15 वर्षांत पहिल्यांदाच उद्योगाच्या वाढीला ब्रेक लागला आहे. जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर FY 2025-26 साठी सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) महसूल 40,000 कोटींवर घसरू शकतो, जो सध्याच्या 80,000 कोटींच्या तुलनेत 50% कमी असेल.
The markets are finally correcting. Given that markets swing between extremes, they can fall more just like they rose to the peak.
I’ve no idea where the markets go from here, but I can tell you about the broking industry. We are seeing a massive drop in terms of both the number… pic.twitter.com/wHO6hSRdbA
— Nithin Kamath (@Nithin0dha) February 28, 2025
बाजारातील घसरणीमुळे ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये मोठी घट
ऑप्शन्स ट्रेडिंग:
सरासरी दैनंदिन व्यवहार ₹47,897.3 कोटी
ऑल-टाइम हाय (ATH) पेक्षा 46% घट
किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग 41% कमी
इक्विटी ट्रेडिंग:
सरासरी दैनंदिन व्यवहार ₹88,408.6 कोटी
ऑल-टाइम हाय (ATH) पेक्षा 42% घट
किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग 41% कमी
फेब्रुवारीच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारातही घसरण झाली. शेअर बाजारात सलग पाचव्या महिन्यात घसरण झाली आहे. 1996 मधील घसरणीनंतर निफ्टीमध्ये सलग पाच महिने घसरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सप्टेंबरच्या अखेरीपासून बाजारात घसरण सुरू असून या काळात गुंतवणूकदारांचे 85 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा – High Court : पुरुषांना फसवण्याचा ट्रेंड, तक्रारदार महिला नेहमीच विश्वासार्ह नसतात, काय म्हणाले न्यायालय –