घरताज्या घडामोडीNext Pandemic Warning: कोरोनानंतर 'या' आजारामुळे येणार पुढील महामारी, WHOचा इशारा

Next Pandemic Warning: कोरोनानंतर ‘या’ आजारामुळे येणार पुढील महामारी, WHOचा इशारा

Subscribe

अजूनही संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत आहे. अशातच आता जागतिक आरोग्य संघटनेने भविष्यातील महामारीबाबत इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, ‘किडकांपासून होणारा आजार धोका वाढवत आहे. अशातचा हे आजार पुढील महामारीचे कारण ठरू शकतात. या आजारांमध्ये झिका, यलो फिवर, चिकनगुनिया आणि डेंग्यूचा समावेश आहे, जे मच्छर आणि किड्यांमुळे पसरतात.’ आफ्रिकन देशांमध्ये झिका व्हायरसने महामारीचे रुप धारण केले आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर जगभरातील चिंतेत आणखीन वाढ झाली आहे.

जगातील या लोकांना जास्त धोका

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, ‘मच्छर आणि किड्यांपासून पसरवणारे आजार पुढील महामारी असण्याच्या यादीत वरच्या स्थानावर आहे. महत्त्वाचे म्हणजे उष्णकटिबंध आणि उप-उष्णकटिबंधात राहणाऱ्या लोकांना सर्वाधिक धोका आहे. या भागात जगातील बरेच देश आहेत, ज्यामध्ये ४०० कोटी लोकं राहतात. दरम्यान विशेषतज्ज्ञ कोविडची पुनरावृत्ती थांबण्यासाठी रणनिती बनवत आहेत.’

- Advertisement -

…आता पर्याप्त तयारी करण्याची आवश्यकता – WHO

जागतिक आरोग्य संघटनेमधील इंफेक्शियल हॅजर्ड प्रिपेअरनेस टीमचे संचालक डॉ. सिल्वी ब्रायंड म्हणाले की, ‘मागील दोन वर्षांपासून आपण कोरोना महामारीचा सामना करत आहे आणि यामुळे आपण कठीण पद्धतीने जीवन जगणे शिकलो आहोत. भविष्यातील होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठी आपल्याला पहिल्यापासून पर्याप्त तयारी करण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे २००३ मधील सार्स आजारानंतर पुढील महामारीसाठी तयार राहण्याची संधी होती. आपल्याला इन्फ्लूएंजा २००९ महामारीने इशारा दिला होता, परंतु आम्ही कोणतीही तयारी केली नाही.’

जागतिक आरोग्य संघटनेची नवी ग्लोबल अर्बोव्हायरस इनिशिएटिव्हने शुभारंभाच्या दिवशी सांगितले की, ‘पुढील महामारीला अर्बोव्हायरस कारण होऊ शकते. यामध्ये मच्छर आणि किड्यांमुळे होणाऱ्या आजारांचा समावेश आहे. आम्हाला धोका वाढत असल्याचे काही संकेत मिळाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन ग्लोबल अर्बोव्हायरस इनिशिएटिव्हच्या निर्मितीचा उद्देश किटक-जनित धोक्यांशी सामना करण्यासाठी कार्य करणे आहे.’

- Advertisement -

‘हे’ आजार जगात घालतायत धुमाकूळ

२०१६मध्ये झिका व्हायरसने ८९हून अधिक देशांमध्ये धुमाकूळ घातला होता. तर यलो फिवर २०००सालापासून वाढत आहे. हा आजार जगात ४० देशांमध्ये फैलाव होण्याचा धोका जास्त आहे. तसेच डेंग्यू प्रत्येक वर्षात १३० देशांमध्ये ३९० मिलियन लोकांना संक्रमित करत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे. चिकनगुनिया जर कमी लोकांना जीव घेत असला तरी, याचा प्रभाव ११५ देशांमध्ये पाहायला मिळाला आहे.


हेही वाचा – WHO : कोरोना लस आणि कर्णबधीरपणाचा काय संबंध ? WHO च्या अभ्यासाला सुरूवात


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -