घरताज्या घडामोडीZika Virus in UP: झिकाची लागण झालेल्या महिलेने जुळ्या मुलांना दिला जन्म;...

Zika Virus in UP: झिकाची लागण झालेल्या महिलेने जुळ्या मुलांना दिला जन्म; एकाची प्रकृती गंभीर

Subscribe

देशावर कोरोनाचे संकट असतानाच झिका व्हायरसचा प्रसार होऊ लागला. केरळ राज्यापासून हळूहळू देशातील इतर राज्यांमध्ये झिका व्हायरस पसरू लागला. कानपूरमधील एका महिलेला पहिल्यांदा झिकाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता कानपूरमधील काजीखेडाची रहिवाशी महिला प्रतिमाने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. यामधील एक निरोगी नवजात बाळ आईजवळ आहे. दुसऱ्या नवजात बाळाची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्याला नर्सिंग होमच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

माहितीनुसार, या नवजात बाळाच्या हृदयाच्या ठोक्यात समस्या निर्माण होत असून श्वास घेण्यास त्रास होत आहे. तसेच यकृतावर देखील परिणाम झाला आहे. तज्ज्ञ डॉक्टर मॉनिटरिंग करत आहेत.

- Advertisement -

काजीखेडातील रहिवाशी भरत महतोची पत्नी प्रतिमाची झिका संक्रमित रिपोर्ट ८ नोव्हेंबरला पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळेस ती गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात होती. प्रतिमाला गीतानगर येथे असलेल्या वीमेंस अँड चाईल्ड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल केले होते. भरत महतो म्हणाले की, १२ नोव्हेंबरला ऑपरेशन करून पत्नीची प्रसूती झाली. डॉ. मोनिक सचदेवा यांनी पत्नीची प्रसूती केली. एक बाळ ठीक आहे. डॉक्टरांनी दुसऱ्या बाळाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. प्रतिमाला मंगळवारी रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. आरोग्य विभागाची टीम जाऊन त्याचे युरीन सँपल घेतले आहे.

प्रतिमा म्हणाली की, झिका पॉझिटिव्ह आल्यानंतर जास्त समस्या उद्भवल्या नाहीत. तिला आता मुलाची काळजी वाटत आहे. पहिल्यांदा डॉक्टरांना मुलं ठिक असल्याचे सांगितले होते. आयसीयूमधील दाखल असलेल्या नवजातची स्थितीवर जीएसवीएम मेडिकल कॉलेजच्या बालरोग तज्ज्ञ देखरेख ठेवत आहेत. नवजात बाळाला मायक्रोसेफली या झिका संबंधित कोणतीही समस्या नाही. पण नवजात बाळाच्या उपचारात समस्या येत आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत कानपूरमधील ९ गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली आहे. यामधील २ जण आता निगेटिव्ह आल्या आहेत. एका महिलेची प्रसुती झाली आहे. आरोग्य विभागाची टीम ६ महिलांवर उपचार करत आहे.


हेही वाचा – Vaccination : २ ते १७ वर्षांच्या मुलांना जानेवारीपासून मिळणार ‘Covaxin’ ची लस


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -