Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Coronavirus: कोरोनामुळे शाळा झाल्या बंद; कमी वयात मुली प्रेग्नेंट होण्याची वाढली संख्या

Coronavirus: कोरोनामुळे शाळा झाल्या बंद; कमी वयात मुली प्रेग्नेंट होण्याची वाढली संख्या

Subscribe

झिम्बाब्वेमध्ये बाल विवाह करण्यामागे गरीबी हे प्रमुख कारण आहे. येथे गरीबीचे प्रमाण जास्त असल्यामुळे मुलींचे कमी वयात लग्न केले जाते.

जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने भयानक रुप धारण केले आहे. त्यामुळे अनेक देशांनी पुन्हा निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. कोरोनापासून मुलांचा बचाव करण्यासाठी पुन्हा शाळा बंद केल्या आहेत. पण शाळा बंद करण्याच्या निर्णयानंतर झालेले परिणाम पाहून दक्षिण आफ्रिकेतील झिम्बाब्वे सरकारची झोप उडाली आहे. कोरोनाच्या काळात कमी वयाच्या मुली वेगाने प्रेग्नेंट होत असल्याचे झिम्बाब्वेमधून समोर आले आहे. या देशात लग्नाचे वय कायदेशीररित्या ठरलेले नाही. यामुळे झिम्बाब्वेमध्ये सेक्स करणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. कोरोनामुळे बऱ्याच काळापासून येथे शाळा बंद आहेत, त्यामुळे लहान वयात मुली प्रेग्नेंट होण्याची समस्या आणखीनच गडद झाली आहे.

झिम्बाब्वेमध्ये विवाहासाठी दोन कायदे आहे. त्यामध्ये एक विवाह कायदा आणि दुसरा पारंपारिक विवाह कायदा आहे. पण विवाहासाठी वय किती असावे याबाबत कोणत्याही कायद्यात नमूद केलेले नाही. तसेच पारंपारिक विवाह कायद्यामध्ये अनेक विवाह करण्याची मान्यता देण्यात आली आहे. यामुळे कोरोनाच्या काळात शाळकरी मुली प्रेग्नेंट राहण्याची समस्या अधिक वाढली आहे.

- Advertisement -

WION वृत्तानुसार, पंधरा कोटी लोकसंख्या असलेल्या हा देशांमध्ये मार्च २०२०पासून लॉकडाऊन आहे. पहिल्यांदा ६ महिन्यांसाठी शाळा पूर्णपणे बंद केल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा मधेमधे खुल्या केल्या होत्या. विशेष म्हणजे मुलींना  गर्भनिरोधक औषधे आणि दवाखान्यातील प्रवेश बंद केला होता. यामुळे प्रेग्नेंट होण्याची संख्या वेगाने वाढली.

ऑगस्ट २०२०मध्ये सरकारने एका कायद्यामध्ये बदल केला होता. ज्यामध्ये शाळेकरी मुलींची प्रेग्नेंट होण्याची संख्या वाढल्यानंतर त्यांना शाळेत येणास मनाई केली होती. त्यानंतर या धोरणात बदल केला गेला होता. पण तरीही प्रेग्नेंट मुली शाळेत परतल्या नाहीत.

- Advertisement -

दरम्यान नवीन विवाह विधेयक संसदेसमोर चर्चेसाठी आहे. ज्यामध्ये १८ वर्षाखालील कमी वयाच्या व्यक्तीच्या विवाहावर बंदी घालणे आणि अल्पवयीन व्यक्तीच्या विवाहात सामिल झालेल्या कोणावरही खटला चालवण्यास अनुमती देण्यात आली आहे.

झिम्बाब्वेमध्ये १८ वर्षांच्या आधी एक तृतीयांश मुलींचे लग्न केले जाते आणि १५ वर्षांच्या आधी ४ टक्के मुलींचे लग्न केले जाते. त्यांना शिक्षणापासून वंचित केले जाते. यामुळे लैंगिक हिंसाचाराची शक्यता वाढते आणि त्यांना बाळंतपणात मृत्यू किंवा गंभीर दुखापत होण्याचा अधिक धोका असतो. दरम्यान झिम्बाब्वेमध्ये बाल विवाह करण्यामागचे कारण गरीबी आहे. जिथे आई-वडील कमी लोकांना कसे खायला देता येईल या हेतूने मुलींचे कमी वयात लग्न करतात.


हेही वाचा – Coronavirus: आता X-raysच्या माध्यमातून कोरोना, ओमिक्रॉनची लागण झालेय की नाही कळणार, वैज्ञानिकांचा नवा शोध


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -