घरअर्थजगतBlinkit ची Zomato मध्ये विलीनीकरण करारावर स्वाक्षरी; CCI कडून मंजुरीची प्रतिक्षा

Blinkit ची Zomato मध्ये विलीनीकरण करारावर स्वाक्षरी; CCI कडून मंजुरीची प्रतिक्षा

Subscribe

Zomato-Blinkit Deal: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) आणि ऑनलाइन किराणा विकणारी ब्लिंकिट (Blinkit) यांनी विलीनीकरणाचा करार केला आहे. Blinkit ने नुकतचं Zomato मध्ये विलीनीकरण करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार पूर्णपणे स्टॉक आधारित आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, हा करार सुमारे $700 दशलक्ष असू शकतो, जो ब्लिंकिटच्या शेवटच्या अंदाजे मूल्यांकनापेक्षा कमी आहे.

झोमॅटोकडून 100 कोटी डॉलर जमा करून युनिकॉर्न बनली ब्लिंकिट

ब्लिंकिटने झोमॅटोकडून एका फेरीत 100 कोटी डॉलर जमा केले, ज्यामुळे कंपनीला युनिकॉर्नचा दर्जा मिळाला. लिस्टेड फूड टेक कंपनी यासाठी मान्यता मिळवण्याच्या उद्देशाने लवकरच कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाशी संपर्क करणार आहे.

- Advertisement -

झोमॅटो आर्थिक अडचणीत सापडलेल्या ब्लिंकिटला 75-100 कोटी डॉलरचे कर्ज देणार आहे. ब्लिंकिट आर्थिक संकटाशी सामना करत असल्याची घटना यावेळी समोर आली जेव्हा ब्लिंकिटने आपल्या कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढून टाकले, तसेच अनेक स्टोअर बंद केले. तसेच बाजारातील वाढत्या स्पर्धेदरम्यान काही विक्रेत्यांना देय देण्यास विलंब केला आहे.

झोमॅटोने IPO पूर्वी ब्लिंकिटचा 10 टक्के स्टेक घेतला विकत

झोमॅटोने मागील वर्षी जुलैमध्ये त्याच्या IPO च्या अगदी आधी ब्लिंकिटमधील 10 टक्के भागभांडवल खरेदी केली. $1 बिलियनच्या मुल्यांकनात विकत घेतले होते. यातून ब्लिंकिटला Zomato कडून 500 कोटी डॉलर मिळणार आहे, परंतु बाजारातील परिस्थिती आणि न्यू एजस्टॉक्सच्या घसरणीमुळे हे होऊ शकले नाही. असे वृत्त आहे.

- Advertisement -

गेल्या महिन्यात ब्लिंकिटने इनोव्हन कॅपिटलकडून 10 कोटी डॉलरच्या कर्जासाठी टर्मशीटवर स्वाक्षरी केली, जी कंपनीला तीन हप्त्यांमध्ये मिळणार आहे. त्यात गेल्या महिन्यातच पहिला हप्ता म्हणून २५ कोटी रुपये मिळाले.

ब्लिंकिटने अनेक शहरांमध्ये झाले बंद

ब्लिंकिटने अलीकडेच मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता येथील रायडर्स, पिकर्स आणि स्टोअर मॅनेजर यांसारख्या विभागांना वेड आउट केले. कंपनीकडे सध्या 2,000 पेक्षा जास्त लोक पेरोलवर आणि 30,000 ग्राउंड स्टाफ आहेत. कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यानेन कर्मचार्‍यांची संख्या 5 टक्क्यांनी कमी झाली आहे.


आमिर खान ‘या’ स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रिमेक करणार; अशी असेल स्टोरी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -