ZyCoV-D Vaccine : लहान मुलांना लवकरचं मिळणार कोरोना लस, केंद्राकडून झायकोव्ह-डीचे १ कोटी लस खरेदीचे आदेश

ZyCoV-D Vaccine now children will get the vaccine central government has ordered to buy one crore doses
ZyCoV-D Vaccine : लहान मुलांना लवकरचं मिळणार कोरोना लस, केंद्राकडून झायकोव्ह-डीचे १ कोटी लस खरेदीचे आदेश

केंद्र सरकराने अहमदाबादमधील झायडस कॅडिला कंपनीच्या ZyCoV-D या तीन डोस लसीचे १ कोटी डोस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लहान मुलांनाही आता लवकरचं कोरोनाविरोधी लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रीय कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेत ही लस येत्या महिन्याभरात सामील होईल अशी माहिती समोर येत आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात विकसित केलेल्या जगातील पहिल्या डीएनएवर आधारित ZyCoV-D या कोरोनाविरोधी लसीला लसीकरण कार्यक्रमात सहभागी करु घेण्यास प्रयत्न सुरु करण्यास हिरवा झेंडा दिला आहे. ही लस सुरुवातील वृद्धांना देण्यात येणार आहे.

केंद्राकडून १ कोटी डोसची ऑर्डर

भारताच्या केंद्रीय औषध नियामक मंडळाने १२ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांच्या लसीकरणासाठी मंजुरी दिलेली ZyCoV-D ही पहिलीच लस आहे. केंद्राने झायडस कॅडिला कंपनीला झायकोव्ह-डी लसीच्या १ कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. या लसीला टॅक्समधून सवलत देण्यात आली असून साधारणपणे ही लस ३५८ रुपयांना उपलब्ध होणार आहे.

या किंमतीमध्ये ९३ रुपयांचा जेट एप्लीकेटरचा खर्च समाविष्ट आहे. याचा उपयोग करुनच लसीचा डोस दिला जाईल. २८ दिवसांच्या अंतराने या लसीचे तीन डोस दिले जातील,केंद्रीय औषध नियामक मंडळाने २० ऑगस्टला या लसीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे.