घरदेश-विदेशदिलासा! आणखी एक कोरोना लस प्रभावी; ३० हजारांहून अधिकांवर होणार शेवटचे परिक्षण

दिलासा! आणखी एक कोरोना लस प्रभावी; ३० हजारांहून अधिकांवर होणार शेवटचे परिक्षण

Subscribe

आता कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी अर्ज केला आहे

जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू असताना कोरोनावर नियंत्रण मिळवणाऱ्या लसीचे लसीकरण कधी सुरू होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर प्रभावी ठरणारी आणखी एक स्वदेशी कोरोना लस लवकरच उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीने तयार केलेली ही कोरोना लस दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत प्रभावी ठरले आहे. कंपनीने गुरूवारी असा दावा केला की, आता कोरोना लस चाचणीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी ३० हजार लोकांना यामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झायडस कॅडिला या लसीच्या आतापर्यंत दोन मानवी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. चाचणी दरम्यान सुमारे एक हजार लोकांना डोस देण्यात आला होता. ही लस दिल्यानंतर लोकांना पुरेशा प्रमाणात अँटीबॉडी मिळत आहे, असे दिसून आले. आता कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी अर्ज केला आहे. यापूर्वी, आयसीएमआर शास्त्रज्ञांसह भारत बायोटेक कंपनीने देशातील पहिली स्वदेशी लस तयार केली असून सध्या तिची तिसरी चाचणी सुरू आहे.

- Advertisement -

‘ही स्वदेशी लस सुरक्षित असून कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करणारी आहे. दोन्ही टप्प्यातील निकाल सरकारपर्यंत पोहोचवण्यात आला असून येत्या आठवड्यापर्यंत या निकालाचे परीक्षण केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.’, असे झायडस समुहाचे चेअरमन डॉ. पंकज आर पटेल यांनी सांगितले.


कोरोनाच्या लक्षणातही राहिला ऑनड्युटी, सुपर स्प्रेडरने घेतला ७ जणांचा जीव, तर ३०० जण क्वारंटाईन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -