घरताज्या घडामोडीभारताची नवी लस ZyCoV-D सज्ज; विना सुई तीन डोस घ्यावे लागणार

भारताची नवी लस ZyCoV-D सज्ज; विना सुई तीन डोस घ्यावे लागणार

Subscribe

भारतीय कंपनी झायडस कॅडिलाने आपल्या ZyCoV-D या कोरोना लसीला आपात्कालीन वापारासाठी मंजूरी मिळण्याकरिता ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) मागणी केली आहे. मुलांसाठी सुरक्षित म्हटल्या जाणाऱ्या या लसीमध्ये खूप काही खास गोष्टी आहेत. ही पहिली प्लास्मिड DNA लस आहे. महत्त्वाचे म्हणजेच विना सुईच्या मदतीशिवाय फार्माजेट तंत्रज्ञान वापरून या लसीचे डोस दिले जातील. यामुळे साईड इफेक्टचा धोका कमी होईल.

झायडस कॅडिलाच्या ZyCoV-D लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी झाली आहे. यामध्ये २८ हजार स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. भारतातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी चाचणी आहे. याचा अहवाल समाधानकारक असल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या कोरोना लाटेच्या दरम्यान देशात ५० क्लिनिकल साइट्सवर या लसीच्या चाचण्या झाल्या होत्या. ही लस डेल्टा व्हेरियंटवर असरदार असल्याचे सांगितले गेले आहे.

- Advertisement -

अभ्यासात असे आढळले आहे की, झायडस कॅडिलाची ZyCoV-D ही लस १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित आहे. फार्माजेट तंत्रंज्ञानाच्या मदतीने सुईचा वापर न करता ही लस दिली जाणार आहे. यात विना सुईच्या इंजेक्शनमध्ये औषधं भरले जाते, त्यानंतर एक मशीनमध्ये लावून हातावर दिले जाते. मशीनवर असलेले एक बटण क्लिक केल्यानंतर लसचे औषधं शरीराच्या आत पोहोचते.

दरम्यान कंपनीने वर्षाला १० ते १२ कोटी डोसचे उत्पादन करण्याचा दावा केला आहे. झायडस कॅडिलाच्या या लसीचे तीन डोस घ्यावे लागतील. सुईचा वापर न करता तिन्ही डोस दिले जातील. यामुळे साईड इफेक्टचा धोका कमी होतो. ही लस ठेवण्यासाठी जास्त कमी तापमानाची गरज नाही आहे, म्हणजेच लसीची थर्मोस्टेबिलिटी चांगली आहे. यामुळे कोल्ड चेन इत्यादीचा त्रास होणार नाही, ज्याअभावी आतापर्यंत लस वाया जात असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सीरम इन्स्टिट्युटला झटका! लहान मुलांवर लसीची चाचणी करण्यास मिळाली नाही मंजूरी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -