घरCORONA UPDATEसुईविना दिली जाणार Zydus Cadila लस, वाचा कशी असेल पद्धत

सुईविना दिली जाणार Zydus Cadila लस, वाचा कशी असेल पद्धत

Subscribe

झायडस कॅडिला कंपनीच्या कोरोनावरील झायकोव्ह-डी (ZyCov-D) या लसीच्या आप्तकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी या विषाणूचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. मात्र, त्याचवेळी समाधानकारक बाब म्हणजे झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीच्या कोरोनावरील झायकोव्ह-डी (ZyCov-D) या लसीच्या आप्तकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक, मॉर्डनानंतर उपलब्ध होणारी ही पाचवी लस आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा आणखी मजबूत होणार आहे. त्यातच झायडस कॅडिलाच्या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे ही लस सुईविना दिली जाणार आहे.

झायडस कॅडिलाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पी. पटेल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत झायकोव्ह-डी लसीची काही वैशिष्ट्य सांगितली. ही लस त्वचेच्या वरच्या थरावर उच्च दाबाच्या जेटद्वारे दिली जाईल. एका उपकरणाद्वारे ही लस त्वचेच्या वरच्या थरात दिली जाईल. याचा एक थेंब १०० मायक्रो लिटरचा आहे. या लसीचा अगदी लहान डोस आहे, असे पटेल यांनी सांगितले.

- Advertisement -

तसेच ही लस १२ वर्षांवरील मुलांनाही देण्याची परवानगी मिळाल्याचे पटेल म्हणाले. सध्या या लसीची कमी प्रमाणात निर्मिती केली जात आहे. परंतु, ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही एक कोटी डोस तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले. झायडस कॅडिलाची लस कोरोनाविरूद्ध ही एका प्लाज्मिड डीएनए लस आहे, असा असा दावा कंपनीने केला आहे. डीएनए-प्लाज्मिड आधारित ‘झायकॉव्ह-डी’ लसचे तीन डोस असतील.


हेही वाचा – भारतात Zydus Cadilaच्या ZyCoV-D लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -