घरताज्या घडामोडीCorona Vaccine: गुडन्यूज! या आठवड्यात झायडस कॅडिलाच्या लसीला मिळू शकते मंजूरी

Corona Vaccine: गुडन्यूज! या आठवड्यात झायडस कॅडिलाच्या लसीला मिळू शकते मंजूरी

Subscribe

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात लसीकरण वेगाने केले जात आहे. तसेच देशात आता अनेक लसीचे पर्याय उपलब्ध होत आहेत. काही दिवसांपूर्वी म्हणजेच ७ ऑगस्टला जॉनसन अँड जॉनसनच्या लसीला आपातकालीन वापरासाठी केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली आणि यामुळे देशातील नागरिकांना एकूण ५ लसींचे पर्याय उपलब्ध झाले. आता या आठवड्यात देखील आनंदाची बातमी मिळणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, या आठवड्यात झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीच्या लसीला आपातकालीन वापरासाठी मंजूरी मिळून शकते, असे समोर आले आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

- Advertisement -

गेल्या महिन्यात झायडस कॅडिलाने कोरोना लस झायकोव्ह-डीला (ZyCoV-D ) आपातकालीन वापरासाठी मंजूरी मिळण्याकरता ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला अर्ज केला होता. तसेच गेल्या महिन्यात कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले होते की, ‘भारतात कंपनीने ५० हून अधिक केंद्रांमध्ये कोरोना लसीची क्लिनिकल ट्रायल केले आहे. झायकोव्ह-डी ही लस कोरोना विरोधातील एक प्लास्मिड डीएनए लस आहे.’

‘जेव्हा झायकोव्ह-डी लसीला मंजूरी मिळेल, तेव्हा याचा फायदा फक्त वयस्कर लोकांना नाही, तर १२ ते १८ वयोगटातील मुलांना देखील होणार आहे,’ असे कॅडिला हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ, शरविल पटेल म्हणाले.

- Advertisement -

माहितीनुसार, झायडस कॅडिलाच्या या लसीचे तीन डोस घ्यावे लागतील. सुईचा वापर न करता तिन्ही डोस दिले जातील. यामुळे साईड इफेक्टचा धोका कमी होईल. ही लस ठेवण्यासाठी जास्त कमी तापमानाची गरज नाही आहे, म्हणजेच लसीची थर्मोस्टेबिलिटी चांगली आहे. यामुळे कोल्ड चेन इत्यादीचा त्रास होणार नाही, ज्याअभावी आतापर्यंत लस वाया जात असल्याचे म्हटले आहे.


हेही वाचा – इंग्लंडचा भारतीयांना दिलासा, निर्बंध केले शिथिल


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -