Eco friendly bappa Competition
घर आली दिवाळी २०१८ यंदाच्या दिवाळीत ट्रेंड कुकीज,कपकेक्सचा

यंदाच्या दिवाळीत ट्रेंड कुकीज,कपकेक्सचा

Subscribe

दिवाळी म्हटलं की, सगळ्याच गोष्टींची जय्यत तयारी. पण त्यामध्ये जास्त तयारी करावी लागते ते पारंपरिक फराळाची. अर्थात त्यामध्ये चिवडा, चकली, शंकरपाळ्या हे सर्वच पदार्थ आले. या पदार्थांना लागणारा वेळही तसा जास्तच. पण आताच्या धकाधकीच्या आणि ऑफिसमधून सुट्टी न मिळण्याच्या आयुष्यात काही नवे पर्यायही उपलब्ध झाले आहेत आणि सध्या याचा ट्रेंड असल्याचा पाहायला मिळत आहे.

मुळात दिवाळीला घरी फराळ करणं आजकाल बर्‍याच जणांना ऑफिसमध्ये असल्यामुळे जमत नाही. त्यातही ऑफिसमधल्या वर्कलोडमुळे सुट्टी मिळणंही सध्या कठीण झाले आहे. अशामध्ये महागाईची झळदेखील प्रत्येकाला बसत आहे. सध्या बाजारामध्ये १ किलो चिवड्याचा साधारण भाव हा ४०० च्या आसपास आहे तर चकलीचा भाव हा ४५० च्या जवळपास असून करंजी आणि अनारसेही साधारण ४७५ च्या भावात मिळत आहेत. त्यामुळे दिवाळीला आता पारंपरिक पदार्थांबरोबरच नवे पदार्थही बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये सध्या ट्रेंड आहे तो कुकीज आणि कपकेक्सचा. मुळात कमी गोड आणि दिसायलाही तितकेच आकर्षक अशा कुकीज आणि कपकेक्स दिवाळीसाठी खास बनविण्यात येत आहेत. या दोन्ही पदार्थांना यावर्षी पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

या कुकीजमध्ये बर्‍याच व्हरायटी अर्थात चवींमध्ये बदलही आहेत. यामध्ये नारळ, जिरे, चोको चिप्स, टूटी फ्रूटी, स्ट्रॉबेरी, बदाम पिस्ता, जॅम असे विविध प्रकार असल्यामुळे ग्राहक याकडे आकर्षित होत आहेत. शिवाय पटकन संपणार्‍या अशा या पदार्थांची किंमतही वाजवी असल्यामुळे पारंपरिक पदार्थांव्यतिरिक्त सध्या बाजारामध्ये या दोन वेगळ्या पदार्थांना पसंती मिळत आहे. या कुकीज साधारण १ किलो ३५० ते ३६५ पर्यंत मिळतात. तर ६ कप केकचा भावही ३०० ते ३५० पर्यंत असतो. पण यामध्ये वेगळी चव असल्यामुळे हे पदार्थ विकत घेतले जात आहेत.

तसेच दिवाळीला नातेवाईकांच्या घरी भेट देण्यासाठी नक्की काय द्यायचे यासाठीसुद्धा हल्ली बराच विचार करावा लागतो. मात्र हे विविध रंगाच्या आणि चवीच्या कपकेक्स वा कुकीजचा बंच व्यवस्थित पॅक करून द्यायचा एक वेगळा पर्यायही सध्या दिसून येत आहे. एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी केवळ चॉकलेट्स हा पर्याय नसून आता ट्रेंडमध्ये असणार्‍या कुकीज वा कपकेक्स हा पर्यायही उपलब्ध आहे.

- Advertisement -

दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणात कुकीजच्या ऑर्डर्स सध्या येत आहेत. सध्या कुकीज आणि कपकेक्स हा ट्रेंड असून पारंपरिक गोष्टी सोडून लोक इतरही गोष्टींना प्राधान्य देत आहेत. विविध चव आणि आकर्षक असल्यामुळे कुकीजना जास्त पसंती मिळत आहे.
– निखिल खडपे, मालक, द मिओ केक

- Advertisment -