घरदिवाळी २०२१Diwali 2021: जाणून घ्या, भाऊबीजेचा शुभ मुहूर्त आणि महत्व

Diwali 2021: जाणून घ्या, भाऊबीजेचा शुभ मुहूर्त आणि महत्व

Subscribe

दिवाळी म्हटलं की सगळीकडे उत्साह संचारतो. प्रत्येकजण दिवाळीत नवनवीन वस्तुंची खरेदी करतात, यासह आपल्या घराताल सुंदर सजवता रोषणाई करतात. आर्थतच दिवाळी हा सण प्रकाशाकडे घेऊण जाणारा असतो म्हणूनच दिवाळीत आकाशकंदील असो किंवा दिवे यांना सर्वाधीक महत्व असते. यासह विशेष महत्व असते ते लक्ष्मीपूजनाचे तसेच दिवाळीत येणाऱ्या प्रत्येक सणाचे. दिवाळी सणातील सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा सण जो कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा केला जातो तो म्हणजे भाऊबीज. यमद्वितीयाही या दिवसाला म्हटलं जातं. आज सर्वत्र दिवाळाचा शेवटचा सण भाऊबीज साजरा केला जातो. या दिवशी भाऊ-बहीण एकमेकांना भेटवस्तू देऊन एकमेकांच्या प्रती प्रेम व्यक्त करतात. यामुळे हे नातं अधिकाधिक घट्ट होत जातं. भाऊबीज दिवशी भाऊ बहीणच्या घरी जाऊन तिथे भाऊबीज करतो. गेल्यावर्षी कोरोनाचं कोरोनाचा सावटं असल्यामुले अनेकांनी ऑनलाईन पद्धतीने भाऊबीज साजरी केली होती. पण यंदा मात्र कोरोना हळूहळू आटोक्यात येत असल्याने सरकारने निर्बंधी शिथील केले असल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण पाहायला मिळतेय. तसेच यंदाचा भाऊबीज पूजेचा मुहूर्त कधी आहे हे आपण जाणून घेऊयात.(Bhau beej  2021 date importance and shubh muhurta )

6 नोव्हेंबरला यंदाचा भाऊबीज हा सण आला आहे. या दिवशी दुपारी १.१० मिनिटांनी ते दुपारी ३.२१ मिनिटांदरम्यान तुम्ही भाऊबीज करु शकतात तसेच याचा संपूर्ण कालावधी हा ०२ तास ११ मिनिटे इतका आहे.

- Advertisement -

भाऊबीजेशी निगडीत अनेक अख्यायिका सांगितल्या जातात मात्र याचा महत्वपूर्ण संदेश म्हणजे भाऊ-बहिणीमधील असेले नाते आणखी फुलून यावे त्यांच्यातील जवळीक गोडवा टिकून रहावा हा आहे.

या दिवशी भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करतात. कारण त्याची यमराजाच्या पाशातून म्हणजेच मृत्यूपासून सुटका व्हावी आणि त्याला दीर्घायुषी मिळावे हा भाऊबीज सण साजरा करण्यामागचा खरा उद्देश असतो. या भावाला बहीण प्रेमाचा टीळा लावते आणि त्याची रक्षा व्हावी तो निरोगी राहावा यासाठी प्रार्थना करते.

- Advertisement -

हे हि वाचा – Diwali 2021 : दिवाळीनिमित्त शेकडो मशालींनी रायगड उजळला

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -