घरदिवाळी २०२१भाजपाचे लोक घाबरट, त्यांनी काश्मीरमध्ये फिरून दाखवावं; राहुल गांधींचं आव्हान

भाजपाचे लोक घाबरट, त्यांनी काश्मीरमध्ये फिरून दाखवावं; राहुल गांधींचं आव्हान

Subscribe

जम्मू – जम्मू काश्मीरमध्ये भाजपाचा कोणताही नेता माझ्यासारखा चार दिवस पायी प्रवास करू शकत नाही. जम्मू काश्मीरचे लोक त्यांना फिरू देणार नाहीत, असे नाहीत. तर, भाजपाचे लोक घाबरट आहेत, म्हणून ते फिरणार नाहीत. अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं. भारत जोडो यात्रेच्या सांगता कार्यक्रमातील भाषणात त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

तब्बल १४५ दिवसांत १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामधून राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली. आता ही यात्रा जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे पोहोचली आहे. याचठिकाणी राहुल गांधींनी हिमवृष्टी सुरू असनाताच जनतेशी संवाद साधला.

- Advertisement -


जर तुम्हाला जगायचे असेल तर तुम्हाला न घाबरता जगता यायला हवे, हे मी महात्मा गांधीजींकडून शिकलो. मी चार दिवस इथे फिरलो. जम्मू-काश्मीरच्या लोकांनी मला हँड ग्रेनेड दिले नाही, तर खूप प्रेम दिले. अगदी कौतुकाने माझे स्वागत केलं. मला वाटले की, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सुरू केलेला पायी प्रवास कठीण नसेल. मात्र, कन्याकुमारी येथून सुरुवात केल्यावर लगेचच माझा गुडघा दुखायला लागला. मात्र, काश्मीरला येईपर्यंत ते दुःख दूर झाले, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, मी सरकारी घरात राहिलो आहे. कारण माझ्याकडे कधीच घर नव्हते. माझ्यासाठी घर ही संरचना नाही, तर ती जीवन जगण्याची पद्धत आहे. ज्याला तुम्ही काश्मिरियत म्हणता, मी ते घर मानतो. या पृथ्वीवर दोन विचारधारा आहेत, त्यांच्यात वर्षानुवर्षे नाते आहे. त्याला आपण काश्मिरियत म्हणतो. तसेच महादेव शिवशंकरांची विचारसरणी आणि इस्लाममधील विचारसरणी कशी सारखी आहे, याचे उदाहरणही दिले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -