धनतेरसला खरेदी करा ‘या’ वस्तू , होईल भरभराट

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असून घरोघरी आता साफसफाई, खरेदी आणि फराळाची लगबग सुरू झाली आहे. यावेळी २ नोव्हेंबरला धनतेरस असून या दिवसाला विशेष महत्व आहे. धनतेरसच्या दिवशी खरेदी करणे शुभ मानलं जातं. त्यातही काही खास वस्तू यादिवशी खरेदी केल्यास वर्षभर घरात भरभराट राहते अशी धारणा आहे.

धनतेरसच्या दिवशी घर सजावटीचे सामान, दागिणे खरेदी करतात तर काहीजण या वस्तू नरकचतुर्थी आणि दिवाळीलाच खरेदी करतात. पण प्रामुख्याने धनतेरसच्या दिवशी विविध धातुची भांडी खरेदी करणे शुभ मानलं जातं.

सोन्या चांदीचे दागिणे

धनतेरसला सोन्या चांदीचे दागिणे खरेदी करणेही शुभ मानले जाते. आपल्याला परवडेल असे दागिणे यादिवशी घ्यावे.

धातूचे भांडे

बऱ्याच वेळा घरात सगळीच भांडी असतात. यामुळे केवळ धनतेरस आहे म्हणून अनावश्यक भांडी घेणे टाळावे.

त्याजागी स्टीलचा चमचाही घेऊ शकता. दिवाळीच्या दिवसात तो चमचा देवघरात ठेवून त्याची पूजा करावी.

सोळा शृगांर

धनतेरला पतीने पत्नीला शृंगार भेटवस्तू म्हणून द्यावा. यामुळे पत्नी पत्नीचे नाते अधिक दृढ होते. त्यातही पतीने पत्नीला लाल साडी आणि कुंकू किंवा लाल टीकली देणे शुभ मानले जाते.

झाडू

धनतेरसला झाडू विकत घेतला जातो. झाडू खरेदी करणं म्हणजे आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर करणं अशी धारणा आहे.