Eco friendly bappa Competition
घर दिवाळी २०२१ दिवाळीच्या पहाटे लवकर उठून करा 'हे' काम, हमखास होईल धनलाभ

दिवाळीच्या पहाटे लवकर उठून करा ‘हे’ काम, हमखास होईल धनलाभ

Subscribe

हिंदू धर्मात सर्व सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दसरा झाला की सगळ्यांचे लक्ष दिवाळीकडे असते. दिवाळी भारतीयांचा सर्वात आवडता सण समजला जातो. यंदा 24 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल. या वर्षी नरक चतुदर्शी आणि दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते, तर दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते आणि तिसऱ्या दिवशी दिवाळी मात्र यंदा नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. त्यामुळे या दिवशी विशेष योग असणार आहेत.

पौराणिक परंपरेनुसार, दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्री गणेशांची पूजा केली जाते. असं म्हणतात की, दिवाळीच्याच दिवशी श्रीराम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परत आले होते. त्यामुळे अयोध्येतल्या नागरिकांनी आनंद साजरा केला होतो. मात्र या दिवशी अश्विन अमावस्या असल्याने रात्री सगळीकडे अंधार होता. त्यामुळे अयोध्येतल्या लोकांनी मातीचे दिवे लावून सर्व अयोध्या प्रकाशमय करत श्रीरामांचे स्वागत केले. तेव्हापासून हा सण प्रत्येक वर्षी साजरा केला जातो.

- Advertisement -

दिवाळीच्या दिवशी सकाळी करा ‘हे’ उपाय

  • देवी लक्ष्मीला साफ-सफाई खूप प्रिय आहे. त्यामुळे दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करा.
  • त्यानंतर घरातील देवांची पूजा करा. घराबाहेर सुंदर रांगोळी काढा. घराबाहेर फुलांचे तोरण बांधा.
  • मुख्यदार पुसून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढा.
  • घरामध्ये सुवासिक अत्तर शिंपडा किंवा गुलाबजल शिंपडा.
  • दिवाळीच्या दिवशी स्वच्छ सुंदर वस्त्र परिधान करा.
  • संध्याकाळी पूजा करताना देवी लक्ष्मीची आरती करा आणि देवी लक्ष्मींच्या स्तोत्रांचे आणि मंत्राचे पठण करा.असं म्हणतात की, असं केल्यास देवी लक्ष्मी खूश होतात.
  • तसेच या दिवशी घरामध्ये कुठेही अंधार ठेवू नका.
  • दिवाळीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.
- Advertisement -

 


हेही वाचा :

नरक चतुर्दशीच्या दिवशी घरामध्ये लावा 14 दिवे; मिळेल सुख-समृद्धी

- Advertisment -