Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर दीपोत्सव यंदा फटाके खाऊन साजरी करा दिवाळी

यंदा फटाके खाऊन साजरी करा दिवाळी

यंदा फटाके नाहीत पण फटाक्यांचे चॉकलेट्स मात्र बाजारात उपलब्ध आहे. या चॉकलेट्सना यंदा बाजारात प्रचंड मागणी आहे.

Related Story

- Advertisement -

दिवाळी म्हणजे फराळ आलाच. फराळासोबतच चॉकलेटही दिवळीचे गिफ्ट म्हणून दिले जातात. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स उपलब्ध आहेत. यंदा दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी ही इको फ्रेंडली दिवाळी म्हणून साजरी करणार आहोत. यंदा फटाके नाहीत पण फटाक्यांचे चॉकलेट्स मात्र बाजारात उपलब्ध आहे. या चॉकलेट्सना यंदा बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे यंदा फक्त चॉकलेट देण्यासाठी क्रॅकर्स चॉकलेट म्हणजेच फटाक्यांचे चॉकलेट्स तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता.

ठाण्याच्या प्रियांका लाड – ठाकरे  या ‘प्रिअवि’ चॉकलेट्सच्या माध्यमातून क्रॅकर्स चॉकलेटची विक्री करतात. यात ड्रायफ्रूट्स चॉकलेट, प्रिमियम चॉकलेट्स, आलमंड चॉकलेट्स आणि फटाक्यांचे चॉकलेट्स असे विविध प्रकारचे चॉकलेट्स बाजारात उपलब्ध आहेत.

- Advertisement -

या वर्षी फटाक्यांच्या चॉकलेट्सना खूप मागणी आहे. दिवाळी आणि फटाके यांचे खूप जवळचे नाते आहे. त्यामुळे दिवाळी म्हणजे फटाके आलेच. मात्र या वर्षी पर्यावरणाची कोणतीही हानी न करता इकोफ्रेंडली दिवाळी साजरी करायची आहे. त्यामुळे यंदा फटाके फोडायला मिळणार नसले तरी ते खाता येणार आहेत. हे खाण्याचे फटाके एडिबल असतात. जे आपण खाऊ शकतो. यात वेगवेगळ्या फ्लेवरचा वापर केला जातो. संपूर्ण नैसर्गिक पदार्थ वापरून हे चॉकलेट फटाके तयार केले जातात.

- Advertisement -

यातीला सर्वात फेमस चॉकलेट म्हणजे क्रंची क्रॅकर्स चॉकलेट. जे तोंडात घालताच कुरकुरीत लागतात.  वेगवेगळ्या फ्लेवर्सप्रमाणे फटाक्यांच्या वेगवेगळ्या आकारातही हे चॉकलेट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. भुईचक्र,पाऊस,सुतळी बॉम,रॉकेट अशा वेगवेगळ्या आकारांचे एडिबल असे फटाक्यांचे चॉकलेट्स बाजारात उपलब्ध आहेत. जे फटाके आपण चक्क खाऊ शकतो.

चॉकलेट खाल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे या दिवाळीत पर्यावरणासोबत स्व:तचीही काळजी घेऊया. फटाके फोडायला मिळणार नसले तरी एडिबल फटाक्यांचे चॉकलेट्स आपल्याला खाता येणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या नातेवाईकांना आणि मित्र मंडळींना हे फटाक्यांचे चॉकलेट्स गिफ्टही करता येतील.

- Advertisement -