(Union Budget 2025 Tax Slab) नवी दिल्ली : देशाचा अर्थसंकल्प आज शनिवारी (ता. 01 फेब्रुवारी) सादर करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे मोदी 3.0 सरकारच्या या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. परंतु, त्यातही टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल होणार आहेत का? यामुळे नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार की नाही? किती लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर किती कर लादण्यात येईल? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मध्यमवर्गीय जनतेला आणि करदात्यांना अर्थसंकल्पाद्वारे सूट मिळण्याचे संकेत दिले आहेत. (Union Budget 2025 income tax slabs news in Marathi)
2024-25 या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आले होते. त्यामुळे यंदाही तसेच काहीसे बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून प्राप्तीकरातील स्टँटर्ड डिडक्शनची रक्कम वाढवली जाण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात असे केल्यास नोकरदारांच्या उत्पन्नावर आकारण्यात येणाऱ्या कराचे प्रमाण कमी होऊ शकते. मध्यमवर्गीय नोकरदारांना त्यांच्या पगारावर आकारल्या जाणाऱ्या करातून जास्तीत जास्त सूट मिळण्याची सुद्धा अपेक्षा आहे. एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारकडून 10 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न सरसकट करमुक्त केले जाण्याची शक्यता आहे. जर का केंद्र सरकारडून हा निर्णय घेतसा गेला, तर याचा सर्वाधिक फायदा मध्यमवर्गीय आणि लहान नोकरदारांना मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, ओल्ड आणि न्यू टॅक्स रिजीममध्ये tax exemption आणि Tax deduction ची मर्यादा वाढवली जाईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा… Union Budget 2025 : आजच्या अर्थसंकल्पातून कोणत्या क्षेत्राला काय मिळणार? जाणून घ्या
गेल्या काही महिन्यांमध्ये बाजारपेठेतील मागणी घटली आहे. त्यासाठी मध्यमवर्गीयांना अधिकाअधिक सवलती आणि फायदे देऊन त्यांना आकर्षित करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. यामुळे मध्यमवर्गीय नोकरदारांना त्यांच्या पगारावर आकारल्या जाणाऱ्या करातून जास्तीत जास्त सूट मिळेल, अशी अपेक्षा आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात डायरेक्ट टॅक्स कोडची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मध्यमवर्गीय जनतेला आणि करदात्यांना अर्थसंकल्पाद्वारे सूट मिळण्याचे संकेत दिले आहेत.