घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाकदम कुटुंबीयांचा निसर्गप्रेमी बाप्पा!

कदम कुटुंबीयांचा निसर्गप्रेमी बाप्पा!

Subscribe

मुंबईच्या दिनेश कदम यांच्या घरी सात दिवसांसाठी बाप्पा विराजमान झाले होते. कदम कुटूंबियांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला आहे. अतिशय सुंदर पध्दतीने निसर्गपूरक देखावा त्यांनी बाप्पासाठी साकारला आहे. त्याचप्रमाणे बाप्पाची मुर्तूही शाडूच्या मातीची आहे. हा देखावा तयार करण्यासाठी कागद, शाडूची माती, लाकूड, वेगवेगळी झाडं आणि गवताचा वापर केला आहे.


- Advertisement -

मातीने तयार केलेल्या मोदकाच्या आकारात झाडं लावली आहे. आणि सुंदरप्रकारे हे डेकोरेशन सजावले आहे. ‘निसर्ग देवतेला निसर्गाचा प्रसाद’ असा सुंदर संदेशही या देखाव्यावर लिहीला आहे. तसेच मध्ये बाप्पाची सुंदर मुर्ती विराजमान झाली आहे. बाप्पा भोवती केलेल्या या डेकोरेशनमुळे मुर्तीचे सौंदर्य खूप खुलून आले आहे.मुर्तीकार राकेश घोष्टेकर यांनी ही मुर्ती तयार केली आहे. घोष्टेकर यांचे परिवार हे अनेक पिढ्यांपासून शाडूच्या मुर्त्या बनवत आहेत. भाविकांना ज्या पद्धतीने मुर्त्या पाहीजेत, तशा त्या बनवून देण्यात त्यांचा हातखंड आहे.

- Advertisement -

नाव– दिनेश कदम
पत्ता– 2/511 पंचगंगा बिल्डींग,एन.एम जोशी मार्ग,मुंबई

7 प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -