घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाडोंबिवलीत पारूल सचिन पाटणकर यांचा चॉकलेटचा गणपती

डोंबिवलीत पारूल सचिन पाटणकर यांचा चॉकलेटचा गणपती

Subscribe

डोंबिवलीतील पारुल सचिन पाटणकर यांनी चॉकलेटपासून गणपती मूर्ती साकारली असून या आगळ्या वेगळ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांनी पारूल पाटणकर यांचेकडे रांगा लावल्या आहेत. दरवर्षी आपण गणपती बाप्पाची मूर्ती घरी व सार्वजनिक ठिकाणी आणून सण साजरा करतो. ही मूर्ती शाडू किंवा POP ची बनवलेली असते आणि त्यावर घातक रंग वापरले जातात. (जे पर्यावरणासाठी आणि मत्स्यजीवनासाठी अतिशय मोठे नुकसान करतात) ही मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळत नाहीत आणि विहीर, नदी, समुद्रामध्ये तळावर साचून राहते. दरवर्षी, आपण TV किंवा वृत्तपत्रात बघतो किंवा वाचतो की गणपती बाप्पाचे अर्धवट अवशेष नदी किंवा समुद्राच्या काठावर वाहून आलेले असतात, जे मनावर खूप आघात करतात. बरेच लोकं इको फ्रेंडला गणपती आणतात ज्यामध्ये झाडाच्या बियां, कागदाचा लगदा वा इतर साहित्य वापरून मूर्ती बनवली जाते. जी एक चांगली कल्पना असली तरी थोड्या प्रमाणात का होईना पण पर्यावरणाला नुकसान करतात.


हे वाचा –  इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती

- Advertisement -


या उपाय म्हणून पाटणकरांनी चॉकलेटचा गणपती बनवायचे ठरवले. गणपती उत्सव हा चॉकलेटचा गणपती वापरून पूर्णतः सामान्य पद्धतीने साजरा करता येतो. गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून आणि नंतर उत्तरपूजेपर्यंत सर्व काही नेहमीप्रमाणे साजरे करता येते. उत्तरपूजेनंतर हा बाप्पा कोमट दुधामध्ये विसर्जन करून हे चॉकलेटचे दूध आपण महाप्रसाद म्हणून गरिब मुले, अनाथाश्रम किंवा गरजू लोकांना दान करून गणपती बाप्पाला सुरेख पद्धतीने निरोप देऊ शकतो. थोडक्यात मुले खुश, आई पृथ्वी खुश, पर्यावरण खुश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गणपती बाप्पा खुश.

- Advertisement -

स्पर्धकाचे नाव : पारूल सचिन पाटणकर
पत्ता : बी/13, सुखीजिवन को. ऑप. सोसायटी. आनंद बालभवनाजवळ, चित्ररंजन दास रोड, रामनगर, डोंबिवली (पूर्व).


एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -