घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाकुंभारांच्या घरी बाप्पा मडकी घडवताहेत

कुंभारांच्या घरी बाप्पा मडकी घडवताहेत

Subscribe

गुरुदास कुंभार यांच्या घरी गणपती बाप्पा मडकी घडवाताना दिसत आहेत. संत गोरा कुंभार आणि विठुराया यांच्यात वेगळं असं नातं होतं. त्याच नात्याचे मार्मिक दर्शन गुरुदास कुंभार यांच्या घरी होतं. गुरुदास यांनी विठुराच्या रुपातील गणपत्ती बाप्पाची मुर्ती शाडूच्या मातीने तयार केली आणि सजावटीत संत गोरा कुंभाराचा फोटो दर्शवला आहे. जेव्हा संत गोरा कुंभार विठ्ठल भक्तीमध्ये गुंग असायचे तेव्हा विठ्ठल स्वतः येऊन त्याची मडकी घडवून द्यायचे. अगदी तसेच दृश्य कुंभाराच्या घरी पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती


यासंदर्भातव माहिती देताना कुंभार म्हणाले की, ‘भक्त आणि देव यांचं एक वेगळंच नातं असतं. आपल्याला देवाची जशी ओढ असते तशीच देवाला सुद्धा आपल्या भक्तांची काळजी असतेच की. जेव्हा संत गोरा कुंभार विठ्ठल भक्तीमध्ये गुंग असायचे तेव्हा विठ्ठल स्वतः येऊन त्याची मडकी घडवून द्यायचे. हेच देव आणि भक्त यांचं एक वेगळं नातं दाखवायचा प्रयत्न केला आहे.’

- Advertisement -

पत्ता – ए ६१७, सभाष नगर सीएचएस, धार्वी, माहिम, मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -